पणजी : शिवसेनेची लढाई भाजपशी नाही, ‘नोटा’ सोबत असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर पाचही राज्यांचे निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे. गोव्यातील निकालाबाबत याच्या विजयाचं श्रेय हे जनतेचं आहे. महाराष्ट्रात 2024 ची तयारी भाजपने केली असल्याचेही ते म्हणाले.
गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर परत सत्ता मिळवण्याची मोठी जबाबदारी भाजपनं टाकली होती. परिणामी गोव्याच्या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात देखील होती. यात देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी दिसून आलीय. गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अपक्ष आणि एमजीपीला सोबत घेऊन गोव्यात भाजपचे सरकार स्थापन केले जाणार आहे. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला विजय संपादन करता आलेला नाही. यासंदर्भात गोवा निवडणुकीत पक्षाच्या विजयात मोठा वाटा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत होते. The magic of Devendra Fadnavis was seen once again in Goa, where more than 50 meetings were held
संपूर्ण श्रेय गोव्याच्या जनतेचे आणि पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींचे!
बहुमत मिळत असले तरी अपक्ष आणि एमजीपीला सोबत घेणार आहोत.
पणजी भाजपा कार्यालयात माध्यमांशी संवाद…@narendramodi #NarendraModi#BJPAgain #BJP #BJPinGoa #BJP4Goa @BJP4Goa #GoaElections2022 #Goa pic.twitter.com/iZREjxI3vh— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 10, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
देवेंद्र फडणवीस यांनी प्रभारी म्हणजे फक्त नावालाच असतो ही संकल्पना पुसून काढली. त्यानी प्रत्येक मतदारसंघात लक्ष घातले. अनेक उमेदवार बदलले. मनोहर पर्रीकरांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्याच धाडस केलं. खूप टीका सहन करावी लागली तरीही देवेंद्र फडणवीस ठाम राहिले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्टारातून आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची फौज गोव्यात पंधरा दिवस ठेवली. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत इथं थांबून काम केलं.त्याचाच परिणाम म्हणजे गोव्यात भाजपाला घवघवीत यश मिळालं.
अनेक ठिकाणी पक्षाचा निवडणूक प्रभारी असतो त्याच्या बद्दल तक्रारी होतात. तो केवळ नावापुरताच काम करतो मात्र फडणवीस यांनी या निवडणुकीत आपलं संघटनकौशल्य दाखवलं हे निश्चित.
□ देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम
गोव्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी मिळाल्याच्या दुसर्याच दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर पदाधिकार्यांना त्यांनी मुंबईला जेवायला बोलावले आणि त्यांनी लगेच सूत्रे हाती घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात विविध राजकीय वादळे घोंगावत असताना सुद्धा एक पाय गोव्यात तर एक पाय महाराष्ट्रात त्यांनी ठेवला.
सुमारे दीड महिना देवेंद्र फडणवीस गोव्यात तळ ठोकून होते. गोव्याची जबाबदारी स्वीकारताना उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून पक्षात घेतलेले उमेदवार, विविध नेत्यांचे पक्षप्रवेश अशा सार्या बाबींवर त्यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवले आणि बहुतेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केवळ उमेदवारांची निवड नाही, तर प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही त्यांनी खांद्यावर घेतली.
गोव्यातील 40 ही मतदारसंघात एक प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस यांना दररोज अपडेट देत असे आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती आखली जात होती. सुमारे 50 हून अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घेतल्या. अगदी छोट्या-छोट्या समूहात कार्यकर्त्यांच्या सुद्धा सभा त्यांनी घेतल्या. बारकाईने काटेकोर नियोजन, प्रचंड आवाका, सूक्ष्म पातळीवर आखणी, संपूर्ण जबाबदारी स्वत: अंगावर घेणे, कुठेही कुणावर विसंबून न राहणे, सातत्याने बारीकसारीक बाबींचा फॉलोअप यामुळेच हा अपेक्षित निकाल लागू शकला असे आता सांगितले जाते.
□ देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा गोव्यात दिसली !
– सुमारे दीड महिना ते गोव्यात तळ ठोकून होते.
– प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही खांद्यावर घेतली.
– गोव्यातील 40 ही मतदारसंघात एक प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस यांना दररोज अपडेट देत असे आणि त्याप्रमाणे पुढची रणनीती आखली जाईल.
– 50 हून अधिक सभा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घेतल्या.
– अगदी छोट्या-छोट्या समूहात कार्यकर्त्यांच्या सुद्धा सभा घेतल्या.