● प्रियंका गांधींनी लिहले पत्र
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय. रायबरेलीतून भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर अमेठीत समाजवादी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाने इतर सर्व पक्षांना अक्षरशः मातीत गडायचा प्रयत्न केला आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 70 जागांपैकी भाजपा 40 तर काँग्रेस फक्त 17 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भगवी लाट येणार यात कोणताही वाद नाही. याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड काँग्रेस होईल हा काँग्रेसचा दावा या निकालामुळे उधळून गेला आहे.
गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय.
उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. तर भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर इथे काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या फेरीअखेर फक्त 940 मतं मिळाली आहेत.
भाजप उमेदवाराने याठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. बरीच वर्ष आदिती सिंह या राहुल ब्रिगेडचा युवा चेहरा होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार आहेत. तर अमेठीत पहिल्या फेरीअखेर समाजवादी पर्टीचे उमेदवार 1 हजार 100 मतांनी आघाडीवर आहे. तिथे काँग्रेस उमेदवाराला फक्त 477 मतं मिळाली आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे.
Shake the traditional constituency of the Gandhi dynasty, with the Congress in third place
उप्र कांग्रेस के कार्यकर्ताओं, प्रत्याशियों, पदाधिकारियों एवं नेताओं के नाम मेरा संदेश।
जय हिंद
जय कांग्रेस। pic.twitter.com/5hdYsfqIL5— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 9, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी काल ट्विटरवरुन कार्यकर्त्यांच्या नावे एक संदेश दिला.
दरम्यान, देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एका टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसपासून फारकत घेऊन त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता आणि भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंग कोहली यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.