मोहोळ : सोलापूरकडून मोहोळकडे येणाऱ्या मोटारसायकलला मोहोळकडून सोलापूरकडे जाणाऱ्या मोटारसायकलने समोरासमोर एकमेकांना धडक दिली. या अपघातामध्ये दोघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आहे की घातपात असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे.
दीपक बाळासाहेब सरवदे (वय १९) व विक्रम नागनाथ प्रक्षाळे (वय २४ रा. नजिक पिंपरी, ता.मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत तर गंभीर जखमी हा माढा येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यास पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.
प्रथमदर्शनी आम्हाला हा अपघात दिसत आहे. परंतु नातेवाईकांची तक्रार असेल, तर याबाबत सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर, यांनी दिली.
पोलीस निरीक्षक अशोक सायकर हे राजकीय लोकांचे ऐकून काम करीत आहेत, असा आरोप करत जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत नाही; तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी आग्रही भूमिका मृताचे नातेवाईक पंचायत समितीचे उपसभापती अशोक सरवदे यांनी घेतली आहे.
Two killed in lanboti accident; A serious injury or accident?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्या दोन्ही मोटारसायकल एका टँकरला धडकल्या. अश्या झालेल्या विचित्र अपघातात एका मोटारसायकलवरील दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. यानंतर तो अपघात आहे की घातपात? यावर मृतांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.
नजिक पिंपरी येथील दीपक सरवदे व विक्रम प्रक्षाळे हे दोघेजण गुरूवारी (ता. १०) सायंकाळी ५:३० वाजनेच्या सुमारास आपली मोटारसायकल (क्र. एम एच १३ सीसी ७७४०) वरून सोलापूरकडून मोहोळकडे येत होते. तालुक्यातील लांबोटी येथील सीना नदीच्या पुलावर आल्यावर समोरून माढा येथील (नाव माहिती नाही) एकजण एम एच ४५ ए के ११३२ या दुचाकीवरून सोलापूरकडे वेगात जात होता.
सध्या या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अचानकपणे दोन्ही मोटारसायकल समोरासमोर आल्याने अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही मोटारसायकल बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या धक्क्याने टँकर (क्र. एम एच ४३ ई ४४६९) समोर पडल्या. त्यामुळे झालेल्या अपघातात सरवदे व प्रक्षाळे हे दोघे जागीच ठार झाले तर माढा येथील मोटारसायकल चालक गंभीररीत्या जखमी झाला.
हा अपघात नसून घातपाताचा प्रकार आहे, त्याबाबतची चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील मृताच्या नातेवाइकांनी मोहोळ पोलिस ठाण्यात घोषणाबाजी करत मोर्चा आणला होता. रात्री उशिरापर्यंत या प्रकरण बाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.