● पुण्यात 300 एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार
मुंबई : हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद व रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटींची तरतूद आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांवरही भर देण्यात आला आहे. महिलांसाठी विशेष स्त्री रुग्णालय उभारण्यात येत आहे.
राज्यातील महिलांसाठी स्त्री रुग्णालयांची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये महिला व नवजात शिशूंसाठी स्त्री रुग्णालयांची उभारणी करण्यात येईल. त्यानुसार, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 10 खाटांची स्त्री रुग्णालये उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अकोला व बीड येथे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणी वर्धनाचे काम हाती घेण्यात येत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
11,000 crore for gynecological hospitals, health department in 16 districts
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ग्रामीण भागातील गरिब रुग्णांना शस्त्रक्रियेविना किडनी स्टोन काढण्यासाठी लिपोस्केप्सी उपचारपद्धती उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये येत्या 2 वर्षात ही उपचारपद्धती सुरू करण्यात येईल. एकूण 60 रुग्णालयात ही उपचारद्धती सुरू करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
□ आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटी
वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली असून, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आरोग्य क्षेत्रासाठी 11 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. यामध्ये सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार असल्याचे सांगत ते म्हणाले की, नाशिक नागपूरमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्था उभारण्यात येणार असून पुणे शहराजवळ 300 एकर जागेवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याची घोषणादेखील यावेळी अजित पवार यांनी केली आहे.
सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारण्यात येणार असून, टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगडमधील खानापूर येथे जमीन देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय अभारण्यात येणार असून, 3 हजार 183 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
□ शेतकऱ्यांना दिलासा, 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ
#कर्ज #loan
#कर्जमाफी #farmers #शेतकरी #budget #Budget2022 #सुराज्यडिजिटल #surajyadigital #DebtForgiveness
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांचे तब्बल 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी केला जाणार आहे.
□ अर्थसंकल्प #Budget2022 #surajyadigital
– मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी 500 कोटींची तरतूद
#budget #अर्थसंकल्प
– महाबळेश्वर, अजिंठा, वेरुळचा सर्वांगिण विकास करणार, सुविधा केंद्र सुरु करणार
#सुराज्यडिजिटल #mumbai #हैदराबाद #haidrabaad
– मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
#pune #nagpur
– मुंबई, पुणे, नागपूरमध्ये स्वातंत्र्यलढा हेरिटेज वॉक सुरु करणार
□ अर्थसंकल्प – अजित पवारांची घोषणा
#surajyadigital
– भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ सुशोभीकरण
#AjitPawar #budget
– संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार
#Budget2022
– उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासाठी 1 हजार 619 कोटींची तरतूद
#सुराज्यडिजिटल
– महिला आणि बालविकास विभागासाठी 2 हजार 472 कोटींची तरतूद