अक्कलकोट : अक्कलकोट येथील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. राजकारणात टिकून राहण्यासाठी म्हेत्रेंची श्रेय घेण्याची धडपड चालल्याचे म्हटले.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, गेली अडीच वर्षे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विकास कामे करताना मी कधीच गटातटाचे, पक्षपातीचे राजकारण केले नाही आणि भविष्यात करणार नाही. विकास कामे करताना सुद्धा जे जे काम आजपर्यंत केली ते ते काम त्या त्या वेळी जनतेसमोर मांडली. राजकारण करताना राज्यात सत्ता नाही म्हणून मी जनतेसमोर कारण सांगत बसलो नाही, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जनतेसमोर प्रवास करत होतो, त्यावेळी रस्त्याचा कॉमन मुद्दा होता ते मी राज्य अर्थसंकल्पात प्रत्येक वेळी मांडून माननीय मंत्री, प्रशासनाकडे वारंवार हेलपाटे घालून विविध काम मंजूर करून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आजपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र दुर्देवाने माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मात्र जे काम मंजूरच नाही तर पत्रकार परिषद घेतातच कसे, म्हणत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा राजकारणात टिकून राहण्यासाठी चाललेली ही सर्व काही श्रेय घेण्याची धडपड असल्याची टीका केली.
या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, भाजपा माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश हिंडोळे, पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा पोमाजी, आप्पासाहेब बिराजदार, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल ठोंबरे, दयानंद बिडवे, रमेश क्षिरसागर, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाढवे, प्रकाश पाटील, शिवशंकर स्वामी, कांतु धनशेट्टी, नितीन मोरे उपस्थित होते.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी मागील दोन-चार दिवसापूर्वी नागणसूर येथील कार्यक्रमात बोलताना विकास कामाचे पाठपुरावा आम्ही करतो, आणि कुदळ मारण्याचा श्रेय मात्र विरोधक घेत असल्याची अप्रत्यक्षपणे टीका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर केली होती. Former MLA Mhetre’s struggle to survive in politics – MLA Kalyan Shetty
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याला उत्तर देण्यासाठी आज आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आजच्या पत्रकार परिषद सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत खोडून काढले.
पत्रकार परिषदेतील आरोपासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
दुधनी- सिन्नुर , अक्कलकोट – तोळणूर, कल्लहिप्परगा – नावदगी, हैद्रा – नागणसूर रस्त्याचे भूमिपूजन आपण केले आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना ही राज्यसरकार अंतर्गत येतच नाही, तरी आपण रस्ता मंजूर केल्याचे श्रेय घेत आहे. हा रस्ता मी स्वत: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून रस्ता मंजूर करून घेतला आहे. मी हवेत गोळी मारत नाही, मी कागदावर बोलतो, मी खोटे श्रेय घेण्याचा आयुष्यात कधीही प्रयत्न केलेला नाही. मी पाठपुरावा करून मंजूर करून मगच कुदळ मारतो.
आपण मात्र या रस्त्याचे श्रेय घेत आहात. हा रस्ता मंजूर केलेला एखादी लेखी पुरावा तुमच्याकडे असेल तर दाखवा, मी जाहीरपणे माफी मागीन असे म्हणत हे सर्व खोट आहे. म्हेत्रेसाहेब आपण मात्र जनतेला वेड्यात काढण्याचा व फसविण्याचे काम करत आहात. आपण सिनिअर आहात, राज्य मंत्रिपदावर राहिलेला माणूस स्वतःची उंची किती खाली पर्यंत जाणार आहेे. याचा विचार करायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ज्या कामाचा आपला संबंधच येत नाही त्या कामाचे आपण श्रेय घेण्याची धडपड कशाला करता? जनतेला काही कळत नाही असे समजू नका,आणि खोटारडेपणाचा कळस गाठू नका असा आरोप केला.
नुकत्याच जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्वतःच्या व मुलाच्या सांगवी व वरळेगाव गावामध्ये काहीही संबंध नसताना मतदार यादीत नाव नोंदविल्याचेे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटलंय. अक्कलकोट बस स्टॅडसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मी स्वत: वारंवार पाठपुरावा करुन मान्यता मिळवली आहे. याचे ही श्रेय आपण घेत आहात. आज पर्यंत मी कधीच खोट्याकामाचे श्रेय घेतले नाही, अशा या वृत्तीने, खोटारडेपणा मुळेच तालुक्यातील जनतेने ओळखल्याने माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झाल्याचे ही सांगितले. हा सर्व प्रकार राजकारणात टिकून राहण्यासाठी चाललेला खटाटोप असल्याचा टोला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हेत्रेंना लगावला.