मोहोळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना जाणीवपूर्वक बजावलेल्या चुकीच्या नोटीसच्या निषेधार्थ आज मोहोळ शहर व तालुका भाजपच्या वतीने नोटीस दहन आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने केलेले मोठ – मोठे घोटाळे बाहेर काढल्यामुळे धास्तावलेल्या सरकारने चुकीच्या पद्धतीने फडणीस यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १६० नुसार नोटीस काढण्यात आली आहे. वास्तविक विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काढलेल्या भ्रष्टाचारावर कारवाई करणे गरजेचे व अपेक्षित असताना सरकारने ‘उलटा चोर कोतवाल को’ या न्यायाने फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात रविवारी नोटीस दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ नगरपालिकेसमोर नोटीस दहन कार्यक्रम करण्यात आला. देवेंद्र फडणीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, सरकार भाजप की सरकार, अशा घोषणा दिल्या. नोटिसची च्या प्रती जाळण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक व शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर ,भाजपा विधानसभा अध्यक्ष दिलीप गायकवाड, प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष अविनाश पांढरे, माजी सैनिक आघाडीचे नागेश मेजर क्षीरसागर, तालुका सरचिटणीस महेश सोवनी, तालुका सरचिटणीस मुजीब मुजावर, शहर सरचिटणीस विशाल डोंगरे, तालुका उपाध्यक्ष द्रोणाचार्य लेंगरे, माजी शहराध्यक्ष अरविंद मानेसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
BJP agitation across the state: Burning of notice issued to Devendra Fadnavis in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● भाजपच्या नेत्यांनी राज्यभर केले आंदोलन
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर पोलिस बदल्यांमध्ये मोठी देवघेव झाल्याचा अहवाल गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी दिला होता.
यावर राज्य सरकराने कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. गोपनीयतेचा भंग आणि टेलग्रॅफिक ॲक्टनुसार मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली. याचा निषेध म्हणून आज भाजपाकडून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले.
नागपूर, पुणे, सांगली या जिल्ह्यात भाजप नेत्यांकडून नोटीस जाळून महाआघाडी सरकारचा निषेध केला.
भाजपच्या नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली. आमदार गोपिचंद पडळकर यांनीही आज सांगलीतील आटपाडी तालुक्यातील झरे येथे राज्य सरकारच्या या नाकामी कृत्याविरोधात आवाज उठवला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या नोटीसीचे दहन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. हांडेवाडी चौकमध्ये (ता. हवेली) नोटीशीची होळी करून हवेली तालुक्यात भाजपच्या वतीने निषेध केला.
दरम्यान, प्रविण दरेकर यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की मला प्रश्नावली पाठवली होती. मला अधिकार आहेत पण प्रश्नावलीसंदर्भात काही शंका असू शकतात. त्यांना पळवाट काढता आली असती. देवेंद्र फडणवीस हे निष्णात वकील आहेत. सध्याच्या परिस्थितीत कशी वाट काढायची त्या पद्धतीने काम करत आहेत. कोणत्याही मोठ्या नेत्याबद्दल असं आक्षेपार्ह वक्तव्य होऊ नये. केवळ नितेश, निलेश राणेंनी वक्तव्य केलं आहे का? तपासून पाहा मोदींविरोधात अशी वक्तव्ये केली आहेत, असंही दरेकर म्हणाले.