कोलकाता : एका प्रसिध्द अभिनेत्रीने पाकीट चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार कोलकत्यात समोर आला आहे. रूपा दत्ता असं अटक केलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. तर एका मेळाव्यात मारलेले पाकीट, पर्स यांनी भरलेली बॅग एक महिला कचऱ्यात फेकताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आढळून आली. चौकशी करता चोरीचे प्रकरण समोर आले. या बॅगेतून ७५ हजार हस्तगत करण्यात आले आहे, याचा कोलकत्ता पोलीसांनी रुपा दत्ता हिला अटक केली आहे.
बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता पाकिटमारी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक केली. कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान ही घटना घडली असून, या घटनेमुळे बंगाली टॉलिवूड विश्वात खळबळ माजली आहे. अभिनेत्री रुपा दत्ताने हिने बंगाली मालिका, चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आणि ड्रग सप्लाय करण्याचे आरोप केले होते, त्यावेळी रूपा चर्चेत आली होती.
कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये काही पोलीस ड्युटीवर तैनात होते, त्यावेळी त्यांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकताना पाहिले. पोलिसांना तो प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी रूपाची चौकशी केली, पण तिने नीट उत्तर दिले नाही. पोलिसांनी त्यांनंतर तिच्या बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये ही रक्कम आढळून आली.
Famous actress hits pocket, arrested by police; Accounts diary found in the bag
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
चौकशी केली असता, तिने कबूल केले की ती गर्दीत पाकिट मारत होती. तसेच तिने पहिल्यांदाच पाकिट मारले नसून यापूर्वी अनेकदा पाकिट मारल्याचं तिन कबूल केलंय.
● बॅगेत सापडली हिशेबाची डायरी
या महिलेला विधानगर नॉर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी चौकशीअंती हे लक्षात आले की ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता आहे. तिने केलेल्या गुन्ह्याची अभिनेत्रीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत आणि रुपा दत्ताला कोर्टात हजर केले जाणार आहे.
पोलिसांना तिच्या बॅगेत एक डायरी देखील सापडली. त्या डायरीत अभिनेत्री चोरीचा हिशेब ठेवण्यासाठी वापरत होती, अशी माहिती समोर आलीये. हाती आलेल्या वृत्तानुसार, पुस्तक मेळ्यात गस्त घालत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला डस्टबिनमध्ये बॅग फेकताना पाहिलं. त्या पोलिसाला संशय आला आणि त्यांनी तातडीने चौकशी सुरू केली. पोलिसांनी महिलेची झडती घेतली असता तिच्या बॅगेतून आणखी अनेक पर्स सापडल्या.