मोहोळ : मोहोळ पंढरपूर शेटफळ रोडवर शेटफळ जवळ वाघगज वस्ती दरम्यान माल ट्रक पलटी झाल्याने एक जण मयत झाला. हा अपघात आज रविवारी (१३ मार्च) पहाटे पाच वाजणेच्या दरम्यान झाला.
याबाबत मोहोळ पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार , कोल्हापूर येथून ऊस तोडणी मजूर, प्रापंचिक साहित्य, म्हैस गावाकडे बीड जिल्ह्यात घेवून निघाले होते. त्याच्या ओळखीच्या असणारे माल वाहतूक (क्रमांक एम एच ०९ एफ एल३८५२) या मालट्रकच्या पाठीमागे मालासोबत धरुन बसले होते.
कोल्हापूरहून पंढरपूर मार्गे शेटफळ जवळ आल्यानंतर ड्रायव्हरचा वाहनांवरील ताबा सुटला. त्याने रस्ताच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत वाहन चालवत विरोधी बाजूस जाणून पलटी झाला. यात लक्ष्मण मानीकराव बाहीरवाल (वय ५० रा. भाळवणी ता.जि. बिड) याच्या डोक्यास मार लागून जखमी झाला.
हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमास घडला. जखमीस मोडनिंब येथे सरकारी दाखवण्यास उपचारास दाखल करण्यात आले होते परंतु उपचारापूर्वी ते मयत झाले असल्याचे डॉक्टराने सांगितले. याबाबत वाहन चालक सुभाष शिवाजी गुजर (रा. कोल्हापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहे.
A truck overturned near Shetfal in the morning, killing a sugarcane worker
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ तामलवाडी टोल नाक्याजवळ खाजगी बसच्या धडकेने दुचाकी चालक ठार
सोलापूर – तुळजापूर मार्गावरील तामलवाडी टोलनाक्याजवळ खाजगी बसच्या धडकेने दुचाकी चालक ठार झाला हा अपघात शुक्रवारी (ता. ११) रात्रीच्या सुमारास घडला.
विनोद सुरेश मोरे (वय २७ रा. तामलवाडी ता.तुळजापूर) असे मयताचे नाव आहे. तो काल रात्री ११ वाजेच्या सुमारास सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने निघाला होता. तामलवाडी टोल नाक्याजवळ (एनएल०१-बी-१९८२) या क्रमांकाची खाजगी बस धडकल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
□ टेंभुर्णीजवळ दुचाकी घसरल्याने तरुण ठार
सोलापूर – वेगाने जाणारी दुचाकी घसरल्याने एक जण ठार तर दुसरा जखमी झाला. हा अपघात टेंभुर्णी ते वेणेगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडला.
राहुल बाळू कुडाळकर (वय२६ रा. तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे) असे मयताचे नाव आहे. तो काल सायंकाळच्या सुमारास दिगंबर मुंडे (वय २४ रा.कडबे गल्ली,पंढरपूर) याच्या सोबत दुचाकीवरून टेंभुर्णी ते वेणेगाव असा प्रवास करीत होता. वाटेत दुचाकी घसरल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यापेकी राहुल कुडाळकर हा शनिवारी दुपारी मरण पावला. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ नळदुर्ग अपघात; जखमीचा मृत्यू
नळदुर्ग येथे अपघातामध्ये जखमी झालेला अविनाश संजय कांबळे (वय २० रा. नळदुर्ग ता. तुळजापूर) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना शनिवारी (ता. १२) मरण पावला. तो ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास नळदुर्ग येथील घरापासून बसस्थानकाकडे निघाला होता. भीमनगर येथे स्पीड ब्रेकर वरून दुचाकी आदळल्याने तो खाली कोसळून जखमी झाला होता. त्याला नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.