नवी दिल्ली : आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात काँग्रेसचे बड़े नेते उपस्थित होते. बैठकीनंतर रणदीप सुरजेवाला यांनी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहतील याबाबत निर्णय झाल्याचे संकेत दिले. सुरजेवाला म्हणाले की, ‘काँग्रेसने एकमताने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आणि सर्वसमावेशक संघटनात्मक बदल करण्याचे आवाहन केले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आज रविवारी (13 मार्च) राजीनामा देण्याची शक्यता असल्याची बातम्या फिरू लागल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक झाली. यात ते सर्व पदांचा राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे गांधी कुटुंबियांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पक्षातील इतर नेत्यांना संधी मिळावी, अशी मागणी काही नेत्यांनी केल्याचे वृत्त होते.
पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील दारूण पराभवाची चिकित्सा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, यावर एकमत झाले. या बैठकीत सोनिया गांधी यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातच पक्ष वाटचाल करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी बैठकीनंतर दिली.
बैठकीच्या सुरुवातीलाच नेतृत्वाबाबत तक्रार असल्यास पद सोडण्याची तयारी असल्याचे सोनियांनी सूचित केले. परंतु कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. Congress will be led by Sonia Gandhi; But Rahul Gandhi’s name is next
Congress interim president Sonia Gandhi in her speech said that if the party feels we all three (herself, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra) are ready to resign, but CWC unanimously rejected this: Sources pic.twitter.com/vYMRPkEW2D
— ANI (@ANI) March 13, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बैठकीनंतर सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी पक्ष आतापासून तयारीला लागणार आहे, जेणेकरून आव्हानांचा मुकाबला करता यावा. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, इंदिरा गांधी ते राहुल गांधी यांच्यापर्यंत मी पक्षासाठी काम केले आहे. नेतृत्वावरून माझा विरोध नव्हताच. निष्ठावंत असल्याने पक्षसंघटना बळकट कशी करता येईल, हे मला सांगणे जरुरी आहे.
या बैठकीपूर्वी राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी समोर आली होती. राहुल गांधी अत्यंत दृढपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लढा देत आहेत. त्यांच्यासारखा लढा देणारा दुसरा नेता नाही, असे या बैठकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले. पंतप्रधानांना भाषणाची सुरुवात राहुल गांधी यांच्यावर टीका करून करावी लागते. याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही समजवून घ्या. पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी सांभाळावे, अशी आम्हा सर्वांची इच्छा असल्याचे गहलोत यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रियांका गांधी – वढेरा यांनी उत्तरप्रदेशात दिलेल्या लढ्याचे कौतुकही त्यांनी केले. त्यांच्या ‘लडकी हू लढ सकती हू’ या अभियानाचे प्रतिध्वनी देशभरात उमटले आहेत, असे गहलोत यांनी सांगितले. मतांचे ध्रुवीकरण करून भाजपाने चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, असा आरोप करताना, पंजाबमधील अंतर्गत कलहांमुळे पराभव झाल्याची कबुली त्यांनी दिली.
बसपाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशात भाजपासोबत हातमिळवणी केली होती, असा आरोप त्यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधींना देण्याच्या मागणीचे समर्थन केले. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी यांना तत्काळ काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करण्यात यावे, ही काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील पाच राज्यांत आलेल्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पुढे काम करत राहील असे एकमताने ठरवण्यात आले आहेत. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांना बसवण्यात यावे अशी एका गटाकडून मागणी करण्यात येत आहे. तर राहुल गांधी यांनी अधिक लोकांना भेटावे असा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आम्हाला सोनिया गांधी यांच्या नेतृत्वार विश्वास असल्याचे म्हटलं आहे.