● कुमठ्याचे ‘मालक’ अन् वडाळ्याचे ‘काका’ यांच्यातील राजकारण
सोलापूर / विष्णू सुरवसे : मध्यंतरी राष्ट्रवादी हा पक्ष संपणार असल्याचे सांगत अनेकांनी हातावरील घड्याळ काढून फेकून शिवसेना, भाजपमध्ये प्रवेश केला . पण राजकारणात काहीही घडू शकते यानुसार आज राष्ट्रवादीतील इनकमिंग वाढले आहे. आता माजी आमदार दिलीप माने काँग्रेस, शिवसेना मार्गे विधान परिषद सर करण्यासाठी राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. पण यावरूनच कुमठ्याचे मालक आणि वडाळ्याचे काका यांच्यातील राजकारण कसे रंगणार हे पाहावे लागणार आहे.
माजी आमदार दिलीप माने हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी जोरदार चर्चा मानेंच्या कार्यकर्त्यातून केली जात आहे. त्यातच आजपर्यंत ४० हून अधिक वर्ष शरद पवार यांचे एकनिष्ठपणे काम करणारे नेते म्हणून ओळख असलेले , जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचे पक्षातील कितीही मोठे मान्यवर येऊद्या उपस्थित राहणार नसल्याची मूक संमती दिली असल्याची चर्चा काकाच्या कार्यकर्त्यातून होत आहे. Kumtha’s ‘malak’ enters NCP? But Wadala’s ‘kaka’ no entry to the party …
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती निवडणूक असो, सोलापूर जिल्हा दूध संघ असो यात काकांनी व मालकांनी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. सुरू असलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत देखील काकांच्या कार्यकर्त्यांनी सवतीच्या लेकरं म्हणूनच बघितले असल्याचे बोलले जात असताना मालकांची सोसायटी व ग्रामपंचायतीमध्ये आज देखील पकड मजबूत आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष आपली फौंज फाटा मजबूत करीत असताना दिसून येत आहे. त्यातच काँग्रेस पक्षातील अनुभवी, जेष्ठ नेत्यांनी घडाळ्याच्या काट्या सोबत म्हणजेच ‘जमाने के साथ चलो’ अशी ही भावना जोपासत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दिलीप माने हे देखील काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. त्या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली. त्यात अपयश आले. आता ते काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांशी जवळीक साधत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचा पाया भक्कम करण्यासाठी जिल्हास्तरीय पद मिळणार असल्याचे बोलण्यात येत आहे तर दुसरीकडे काकांचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून तसेच सोलापूरच्या काका नाराज होऊ नये म्हणून एक मंडळ देणार, अशीही चर्चा ऐकिवात आहे.
मालकांची एन्ट्रीने उत्तरमध्ये बळकटीकरण होणार असले तरी एकीकडे खुशी तर दुसरीकडे गम असे चित्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे.