नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या खूप पसंत केला जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप मोदी यांनी विरोधकांवर केला आहे. ‘सगळा गट गडबडून गेला आहे, सत्याच्या आधारे फिल्मचे परीक्षण करण्याऐवजी वेगळेच काही तरी सुरू आहे, जगाने हे पहावे असेही त्यांना वाटत नाही, एक प्रकारचे हे षड्यंत्र गेल्या 5-6 दिवसांपासून सुरु झाले आहे, असे मोदी यांनी म्हटले.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदी बोलत होते. “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गेले काढणारे लोक काश्मीर फाइल्स सारख्या तथ्यांवर आधारित चित्रपटांना निव्वळ आकसापोटीच विरोध करत आहेत” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना फटकारले आहे. हा सिनेमा सगळ्यांनी पहायला हवा, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.
या भाषणात त्यांनी भारतीय इतिहास आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटांसारखी माध्यमे किती महत्वाची आहेत ते सांगितले. “महात्मा गांधींसारख्या जगावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीवर भारतात एकही चांगला चित्रपट बनू शकला नाही, जेव्हा बाहेरच्या लोकांनी येऊन त्यांच्यावर चित्रपट बनवला आणि त्याला पुरस्कार मिळाले, तेव्हा जगाला त्यांची माहिती समजली तोपर्यंत ती पोचलीच नव्हती” अशा शब्दांत मोदी यांनी याबद्दलची खंत व्यक्त केली. Conspiracy to stop ‘The Kashmir Files’ continues – Modi
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान म्हणाले, “गेल्या 5-6 दिवसांपासून सगळा गट गडबडून गेलाय. आणि सत्य गोष्टींच्या आधारे, कला म्हणून या फिल्मचं परीक्षण करण्याऐवजी त्याचं श्रेय हिरावून घेण्यासाठीची मोहीम चालवण्यात येतेय. एक संपूर्ण इको-सिस्टीम एखादं सत्य समोर आणण्याचं धाडस करते. त्यांना जे सत्य वाटलं ते मांडायचा प्रयत्न त्यांनी केला. पण हे सत्य समजण्याची किंवा स्वीकारण्याची तयारी दाखवण्यात आली नाही.
□ ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट ऑनलाइन लीक, निर्मात्यांना धक्का
मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. या चित्रपटाची फाईल टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनेक वेबसाईटवरही अपलोड करण्यात आले आहेत. सिनेमागृहात रेकॉर्ड करुन हा चित्रपट अपलोड करण्यात आल्याचे दिसते. दरम्यान, चित्रपट निर्माते अशा वेबसाइट आणि टेलिग्राम चॅनेलवर कारवाई करून चित्रपट कायदेशीररित्या हटवू शकतात.
□ ‘द काश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी सर्व पोलिसांना सुट्टी
मध्य प्रदेश सरकारने ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पोलिसांना हा चित्रपट पाहता यावा, म्हणून त्यांना विशेष एक दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. यासंदर्भातील निर्देश त्यांनी डीजीपी सुधीर सक्सेना यांना दिले आहेत. याआधी मध्य प्रदेश सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली आहे.
□ नरेंद्र मोदींनी केले ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक
#TheKashmirFiles #surajyadigital #Modi #सुराज्यडिजिटल #चित्रपट #NarendraModi
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, निर्माता अभिषेक अग्रवाल आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मोंदीनी या चित्रपटाचे आणि टीमचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी या चित्रपटाचं केलेलं कौतुक आमच्यासाठी खुप खास आहे, असं निर्माते अग्रवाल यांनी म्हटलं आहे.