□ महाराष्ट्रात ‘द कश्मीर फाइल्स’ टॅक्स फ्री होणार का ?
मुंबई : गृहमंत्र्यांचा अजब दावा ‘द कश्मीर फाइल्स’ अनेक राज्यात टॅक्स फ्री झाला आहे. काश्मिरी हिंदुंवरील अत्याचार उघड करणारा चित्रपट आहे आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा सध्या मुख्यमंत्री आहे. त्यामुळे चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होतेय. मात्र गृहमंत्री दिलीप वळसेंनी अजब दावा केला. द कश्मीर फाइल्सच्या बदल्यात आता झुंड सिनेमा मोफत दाखवला जातोय. यामुळे कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या खूप पसंत केला जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप मोदी यांनी विरोधकांवर केला आहे. ‘सगळा गट गडबडून गेला आहे, सत्याच्या आधारे फिल्मचे परीक्षण करण्याऐवजी वेगळेच काही तरी सुरू आहे, जगाने हे पहावे असेही त्यांना वाटत नाही, एक प्रकारचे हे षड्यंत्र गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरु झाले आहे, असे मोदी यांनी म्हटले.
तर दुसरीकडे गृहमंत्री वळसे पाटील यांनी विरोधाभास वक्तव्य केले आहे.‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केलं. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत,” असं म्हणत मोदींनी चित्रपटाचं कौतुक केलं. तर दिलीप वळसे पाटील यांनी चित्रपटामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. Prime Minister Modi made support, but Home Minister Valse-Patil made a different statement
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराशी संबधित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला करमाफी देण्याची मागणी भाजप सदस्यांनी केली होती. मात्र, हा चित्रपटाचा खेळ संपला की, चित्रपटगृहाच्या बाहेर लोकांना एकत्र करुन हिंदू जनजागृती विशेष संवादाच्या माध्यमातून धर्म प्रसार केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता झुंड चित्रपटाचे मोफत खेळ दाखविले जात आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे, असे पाटील यांनी सांगितले.
हरियाणासह अनेक राज्यांनी या चित्रपटावरील टॅक्स माफ केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजपने विधानसभेत केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना दिलीप-वळसे पाटील यांनी चिंता व्यक्त करत ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे.
भाजप नेते आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत तर नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यावर बोलताना दिलीप-वळसे पाटील यांनी या चित्रपटाच्या आडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे, अशी चिंता व्यक्त केली आहे.
□ चित्रपटाविषयी थोडक्यात
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.