मुंबई : मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे मंगळवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी बस फोडली. या प्रकरणी मनसे वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह वाहतूक पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईत परप्रांतीयांविरोधातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील व्यावसायिकांना वाहतूकीचे कंत्राट दिले नसल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तोडफोड करण्यात आलेल्या बसेस दिल्ली कॅपिटल्स संघाच्या आहेत. बसेसची तोडफोड केल्या प्रकरणी मुंबई पोलिसानी सहा अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंची ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. पण या बसेस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या जातात. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नाही. परंतु स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम देण्याची मागणी मनसेने या आधीपासूनच लावून धरली होती.
ताज हॉटेलमध्ये आयपीएल खेळाडूंची बस उभी होती. त्या बसची तोडफोड करुन मनसे वाहतूक शाखेने एल्गार केला आहे. यंदा आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रात करण्यात आले आहे. IPL – MNS blows up buses in front of Taj Hotel in Mumbai
Mumbai | An FIR has been registered against 5-6 unknown persons under sections 143,147,149,427 of IPC for allegedly attacking the Delhi Capital IPL team parked bus, police said pic.twitter.com/aED8Z1Hd5G
— ANI (@ANI) March 16, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आयपीएलसाठी खेळाडू मुंबईत दाखल होत आहेत. खेळाडूंसाठी बसेस ठेवण्यात आल्या आहेत. या बसचे वाहतूकीचे कंत्राट राज्यातील किंवा मुंबईतील वाहतूक व्यावसायिकांना देण्यात आले नसल्यामुळे मनसे वाहतूक शाखेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बसेस फोडल्या.
मनसेने मुंबईतील ताज हॉटेलबाहेर आयपीएलमधील खेळाडूंच्या बसेस लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या बसेस फोडल्या असून मनसेचा दणका अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन बसच्या काचा फोडल्या आहे. परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.
आयपीएलच्या खेळाडूंना हॉटेल ते मैदानावर जाण्यासाठी बसेसचा वापर करण्यात येतो. राज्यातील वाहतूक व्यापाऱ्यांना या गोष्टीचे कंत्राट न देता दिल्ली आणि गुजरातमधून या बसेस मागवण्यात येत असतात. स्थानिक व्यापाऱ्यांना वाहतूकीची परवानगी द्यावी अशी मनसेची मागणी होती. परंतु राज्याच्या बाहेरील व्यापाऱ्यांना कंत्राट दिल्याने मनसेने दणका दाखवला आहे.
दरम्यान, यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.