● सहा वेळा विधानसभेमध्ये आमदार
अहमदनगर : कोपरगाव (जि. अहमदनगर)- माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन झाले आहे. ते 94 वर्षांचे होते. सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. शंकरराव कोल्हे यांचा 21 मार्च 2022 रोजी 95 वा वाढदिवस होता. वाढदिवसाला 5 दिवस होते. त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे.
आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.येत्या 21 मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानं कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहावर शोककळा पसरली आहे. शंकरराव कोल्हे यांचे ‘सत्याग्रही शेतकरी’ हे आत्मचरित्र आहे.
कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. 1985 ते 1990 चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. Former Minister Shankarrao Kolhe passes away in Ahmednagar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● कोण होते शंकरराव कोल्हे?
सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज निधन झाले. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. शंकरराव कोल्हे यांचे ‘सत्याग्रही शेतकरी हे आत्मचरित्र आहे.
कोपरगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहा दशकांमध्ये महसूल, कृषी, परिवहन आणि उत्पादन शुक्ल या खात्याचे मंत्रिपद भुषवलं आहे. तसेच त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करुन दाखवले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी आग्रही भूमिका मांडणे आणि अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांना ओळखले जायचे.
1985 ते 1990 चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत अनेक पायलट प्रकल्प दिले.