Sunday, May 29, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सलमान खान आता टॉलिवूडमध्ये झळकणार

Surajya Digital by Surajya Digital
March 16, 2022
in Hot News, टॉलीवुड
0
सलमान खान आता टॉलिवूडमध्ये झळकणार
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सलमान खान ‘गॉडफादर’ या दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. याद्वारे सलमान टॉलिवूडमध्ये पाऊल टाकत आहे. सुपरस्टार चिरंजीवी यांनी यासंदर्भात ट्विट केले. ‘गॉडफादरमध्ये तुमचे स्वागत आहे सलमान भाऊ. तुमच्या एंट्रीमुळे प्रत्येकाच्या आत एक वेगळीच उर्जा संचारली आहे आणि त्यासोबतच उत्साहाची पातळी आणखी वाढली आहे. तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करणे ही फार मोठी आनंदाची बाब आहे’, असं चिरंजीवी यांनी ट्विट केलं.

‘गॉडफादर’शिवाय सलमान खान ‘पठाण’ आणि ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खानच्या या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा खूपच खास असणार आहे. सध्या सलमान ‘टायगर 3’मध्ये व्यस्त आहे आणि या चित्रपटावर तो खूप मेहनत घेत आहे. त्याला या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट पूर्ण करायचा आहे आणि तो 2023च्या सुरुवातीला प्रदर्शित करण्याचा विचार करत आहे.

काही दिवसांपासून अशी चर्चा होती की, सलमान साऊथ सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटात दिसणार आहे. याबद्दल सर्व चाहते खूप उत्सुक होते आणि अधिकृत घोषणेची वाट पाहत होते. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. चित्रपटात काम केले आहे. यानंतर आता लवकरच सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. Salman Khan will now star in Tollywood

Welcome aboard #Godfather ,
Bhai @BeingSalmanKhan ! Your entry has energized everyone & the excitement has gone to next level. Sharing screen with you is an absolute joy. Your presence will no doubt give that magical #KICK to the audience.@jayam_mohanraja @AlwaysRamCharan pic.twitter.com/kMT59x1ZZq

— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) March 16, 2022

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

नुकतंच चिरंजीवीने त्यांच्या ट्विटरवर एक फोटो ट्विट केला आहे. यात त्यांनी सलमानचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. त्यासोबतच त्यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. या चित्रपटात सलमानचे स्वागत करताना चिरंजीवी म्हणाले, ‘गॉडफादर मध्ये तुमचे स्वागत आहे भाऊ. तुमच्या एंट्रीमुळे प्रत्येकाच्या आत एक वेगळीच उर्जा संचारली आहे आणि त्यासोबतच उत्साहाची पातळी आणखी वाढली आहे. तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करणे ही फार मोठी आनंदाची बाब आहे. तुमची उपस्थिती प्रेक्षकांसाठी एक जादू असेल.

 

खुद्द चिरंजीवीनेच ‘गॉडफादर’मध्ये सलमान खानच्या एण्ट्रीची घोषणा ट्विटद्वारे केली आहे. या चित्रपटातून सलमान खान जोरदार धमाका करताना दिसणार आहे. साऊथच्या चित्रपटात तो पहिल्यांदाच कॅमिओ करणार आहे. या चित्रपटाबाबत अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. या चित्रपटात सलमान खान असल्याच्या बातम्याही अनेकदा आल्या होत्या. मात्र, आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

गॉडफादर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. हा चित्रपट मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक असेल. काही काळापूर्वी चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’मध्ये सलमान छोट्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण आता त्याची पुष्टी झाली आहे. सलमान खान हा लवकरच ‘गॉडफादर’चा भाग होणार असल्याचे ट्विटरवर म्हटलं आहे. सलमान या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. ही भूमिका लूसिफरमधील पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासारखीच असणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज यांनी छोटी भूमिका केली होती.

‘गॉडफादर’ हा पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. सलमान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कंचरण, जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात अनुष्का शेट्टी, राम चरण आणि श्रुती हासन देखील दिसणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनने दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. तो लवकरच ‘पठाण’, ‘कभी ईद कभी दिवाळी’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Tags: #SalmanKhan #now #star #Tollywood#सलमानखान #टॉलिवूड #झळकणार #टॉलिवूड
Previous Post

सिद्धू यांच्यासह काँग्रेसच्या 3 प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

Next Post

भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या 17 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697