सोलापूर : भरधाव दुचाकींची जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात १ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. ही दुर्घटना सोलापूर – तुळजापूर हायवेवर कासेगाव शिवारातील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (ता.१६) सायंकाळच्या सुमारास घडली.
या जखमींना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रदीप मगर यांनी प्रयत्न केले. केवळ १५ मिनिटात जखमींना पोहोच केल्याबद्दल रुग्णवाहिका चालक सागर लोंढे यांचे मगर यांनी आभार मानले.
सोलापूर – तुळजापूर महामार्गावरील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक लागून चौघे जण गंभीर जखमी झाले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी वाढली, मात्र जखमींना मदत करण्यासाठी कोणी पुढे धजावले नाही. त्याचवेळी तुळजापूर तालुका शिवसेना उपप्रमुख प्रदीप मगर यांनी ॲम्बुलन्स बोलावून तातडीने जखमींना रुग्णालयात पाठविले.
सुधीर राऊत, दिनेश भोसले ( दोघे रा. सिंदफळ, तालुका तुळजापूर), समाधान विश्वनाथ दंडवते आणि प्रमोद कोंडीबा मिटकरी (दोघे रा. हिंगणगाव, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. रुग्णवाहिका चालक सागर लोंढे यांनी दुर्घटनास्थळापासून केवळ पंधरा मिनिटात सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत नेले. जखमींपैकी सुधीर भारत राऊत (रा. सिंदफळ) यांचा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. Two two-wheelers collided head-on near Ule village: 1 killed, 2 injured
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या अपघातात एमएच २५/एएफ ४२७० आणि एमएच १३/बीएच ७१०१ या मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बघ्यांच्या गर्दीतून प्रत्यक्ष जखमींजवळ जायला कोणी तयार नव्हते, त्यावेळी प्रदीप मगर यांनी जखमींना ताबडतोब ॲम्बुलन्स बोलावून सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले. त्यांच्या समयसुचकतेमुळे तिघांचे प्राण वाचले.