सोलापूर : माती घेण्याच्या किरकोळ कारणावरून रमाबाई आंबेडकर नगरात दोन गटात तुफान हाणामारी होऊन तलवारी परजल्या. यात दोन्ही गटातील अनेक जण जखमी झाले. दोन्ही गटांनी एकमेकावर तक्रारी दिल्या असून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
श्रीशैल गुंडू बनसोडे (रा.आम्रपाली चौक,न्यू बुधवार पेठ,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना बस डेपो येथे माती घेण्यासाठी गेले असताना संशयित आरोपी अजित गादेकर यांनी तू येथे जेसीबी कशासाठी आणला आहे. माती कशाला घेऊन जात आहे. या कारणावरून डोक्यावर तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. अजित गादेकर, विजय गादेकर, अमोल शिंदे, संजय बनसोडे,सुनील शिवशरण, आकाश शिंदे, संजय बनसोडे, रोहन गायकवाड व दोन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अजित गादेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माती उकरण्याच्या कारणावरून श्रीशैल बनसोडे हटकले असता, मागील वेळेस तू वाचला आहेस आता जर तू आडवा आला तर तुला वामने दादांनी जीवे मारण्याची सांगितले आहे. असे म्हणून आणलेली तलवार फिरवून जिवे मारण्याची धमकी दिली. यात परमेश्वर बनसोडे, मल्लिनाथ बनसोडे, गुड्डू बनसोडे ,बाळासाहेब लोखंडे, आथेस लोखंडे, अजय मस्के, विकी मस्के, यलादास वामने, छोटू अशा १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे व ताकभाते करीत आहेत. In Solapur, two groups fought on the ground with swords; Crimes filed against 20 persons
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
● रस्ता ओलांडताना ट्रकची महिलेला धडक
सोलापूर : रस्ता ओलांडून जात असताना एका ट्रकची महिलेला धडक लागून गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.१४) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील अष्टभुजा देवीच्या मंदिरा मागील रस्ता सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी सुमन गौतम सुरवसे (वय-४८,रा. बुधवार पेठ,आंबेडकर नगर,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक बसवराज मल्लिकार्जुन पत्तार (रा. सिंदगी,जि. विजापूर,रा. कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुमन सुरवसे मार्केट यार्ड मधील सोमानी यांच्या दुकानात काम करत होते. त्यावेळी फिर्यादीची बहीण कमल दिगंबर जेठोथोर ही बाथरूमला जाऊन येते असे सांगून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी रस्ता ओलांडताना ट्रक क्रमांक केए.२८.बी १३१६ या ट्रकचा चालक याने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणाने व भान न ठेवता ट्रक चालून फिर्यादीच्या बहिणीस समोरून जोरात धडक देऊन गंभीररित्या जखमी होण्यास कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली. पुढील तपास पोसई राठोड हे करीत आहे.