Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

20 सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले ! चौघांवर गुन्हा दाखल

सुदैवाने जीवितहानी नाही, पण एक जखमी

Surajya Digital by Surajya Digital
March 30, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
20 सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले ! चौघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरण्याचे काम

पुणे : पुण्यातील कात्रज परिसर मंगळवारी गॅस सिलेंडरच्या स्फोटाने हादरला. गंधर्व लॉन्सजवळ हे स्फोट झाले. याचा व्हिडिओ समोर आला आहे. जवळपास एकामागोमाग 20 सिलेंडरचे स्फोट झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोटांमुळे एकच खळबळ उडाली होती. एका स्टोरेज शेडमध्ये आग लागल्याने हे स्फोट झाले. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत एक जण जखमी झाला.

कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे मंगळवारी सायंकाळी स्फोट झाले. एकापाठोपाठ वीस सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.

स्फोटप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायिक सागर पाटील यांच्यासह संबंधित जागेचा मालक आणि आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे सिलेंडर भरण्याचे काम चालत होते. मात्र गॅस गळतीमुळे मंगळवारी एकापाठोपाठ 20-22 सिलेंडरचे स्फोट झाले. धक्कादायक म्हणजे याठिकाणी अनधिकृतरित्या सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. 141 छोटे तर 26 मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.

20 cylinder blast shakes Pune! Four were charged

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मंगळवारी (ता. 29) सायंकाळी कात्रज येथील सुधामाता मंदिर परिसरात एका पाठोपाठ 22 सिलिंडरचे स्फोट झाले. सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना हे स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर एकूण आठ गाड्यांद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली.

हा परिसर तीव्र डोंगर उताराचा असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचण्यात अडचणी येत होत्या. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी 200 मीटर अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

सुधामाता मंदिर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या सिलिंडरमधून छोट्या पाच किलोच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम अवैधपणे सुरु होते. पण सिलेंडर भरत असताना अचानक सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागली. गॅस गळतीमुळेच हे स्फोट झाले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 16 रिकामे आणि आठ भरलेले मोठे सिलिंडर जप्त केले आहेत.

Tags: #20 #cylinder #blast #shakes #Pune #charged#20सिलेंडर #स्फोट #पुणे #हादरले #चौघांवर #गुन्हा #दाखल
Previous Post

लवकरच या सरकारी बँकेचे होणार खासगीकरण, वाचा कोणत्या बँका ?

Next Post

मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

मुख्यमंत्री  अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697