मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेनने मुंबईतल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गोरेगाव येथील उद्योजक रौनक जतीन व्यास यांनी आपली फसवणूक केली, असा आरोप रिमीने केला आहे. गुंतवणुकीच्या नावावर आपल्याकडून तब्बल 4.14 कोटी रुपये घेण्यात आले, असे तिने म्हटले आहे. या प्रकरणी खार पोलीस चौकशी करत आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर खार पोलीस 29 मार्च रोजी खार ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. अभिनेत्रीने तिच्या लेखी तक्रारीमध्ये नमूद केले की, गोरेगाव येथील रहिवासी आरोपी रौनक जतीन याला ती तीन वर्षांपूर्वी अंधेरीतील एका जिममध्ये भेटली होती, महिन्याभरातचं दोघेही चांगले मित्र बनले.
अभिनेत्रीने तक्रारीत पुढे म्हटले की, तिची गोरेगाव येथील रहिवासी आरोपी रौनक जतीन व्यास याच्यासोबत अंधेरीत एका जिममध्ये तीन वर्षांपूर्वी मैत्री झाली. यावेळी जतीनने स्वत: व्यावसायिक असल्याचे सांगत त्याने एलईडी लाईट्सची नवीन कंपनी उघडणार असल्याचे सांगितले. या कंपनीत त्याने रिमीला गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. तसेच नफा मिळाल्यास 40 टक्के रक्कम परत देईन असे वचन दिले.
यावेळी रिमी सेनने त्या व्यक्तीच्या कंपनीत पैसे गुंतवले. मात्र गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर सेनने त्याच्याकडे पैसे परत मागितले. मात्र यावेळी आरोपी जतीनने तिचे फॉन कॉल्सकडे दुर्लक्ष केले. तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केली.. यावेळी तिला जेव्हा कळले की, आरोपी जतीनने कोणताही व्यवसाय सुरु केलेला नसून तिची आर्थिक फसवणूक केली आहे. यानंतर अभिनेत्राने खार पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केलीय.
Bollywood actress cheated of crores, joined Congress from BJP
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
तपासाअंती, खार पोलिसांनी जतीनविरुद्ध आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, ज्यात कलम 406 (विश्वासघात) आणि कलम 420 (फसवणूक आणि मालमत्तेच्या बनावट वितरणास प्रोत्साहन देणे) अशा कलमांचा समावेश आहे.
अभिनेत्री रिमी सेन एक अभिनेत्री असण्याबरोबरचं एक निर्माता आहे. तिने हंगामा, बागबान, धूम, गरम मसाला, क्यों की, फिर हेरा फेरी आणि गोलमाल यांसारख्या हिंदी, तेलगू आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2015 मध्ये तिने बिग बॉस या रिअलिटी टेलिव्हिजन शोमध्येही भाग घेतला होता.
दिलेल्या मुदतीत परतावा न मिळाल्याने अभिनेत्रीने आरोपी व्यासकडे यासंदर्भात चौकशी केली. मात्र, अभिनेत्रीने विचारणा केली असता आरोपी कायमच टाळाटाळ करत असे. मार्च 2020 मध्ये रिमी सेनने आरोपी व्यासला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं, त्यानंतर आरोपीने तिच्या फर्मच्या बँक खात्यात 3 लाख रुपये ट्रान्सफर केले. नंतर त्याने आणखी पैसे दिले नाहीत.
आरोपीच्या वर्तनाने निराश झाल्यानंर अभिनेत्रीने अखेरीस 3.50 कोटी रुपयांचा चेक जमा केला. परंतु बँक खातं बंद असल्याचं आढळून आलं. त्यानंतर रिमी सेनला समजलं की व्यासने कधीही कोणताही व्यवसाय सुरु केला नाही, त्यानंतर तिने याची माहिती पोलिसांना दिली.
अभिनेत्री रिमी सेनच्या तक्रारीनुसार, खार पोलिसांनी मंगळवारी (29 मार्च) व्यासवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यासशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही मोबाईल नंबरही बंद आहेत. याप्रकरणा पुढील तपास खार पोलीस करत आहेत.
□ भाजपातून केले काँग्रेसमध्ये प्रवेश
रिमी सेनच्या काँग्रेस प्रवेशाची माहिती हरीश रावत यांनी ट्वीट करत दिली होती. त्यांनी रिमीच्या प्रवेशाचा व्हिडीओही शेअर केला होता. हरीश रावत यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं , ‘भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपाची माजी स्टार प्रचारक आता काँग्रेसमध्ये सामिल होत आहे.” गोलमाल, हंगामा, दीवाने हुए पागल, धूम 2, फिर हेरा-फेरी सारख्या हीट चित्रपटात काम करणारी रिमी बिग बॉस-9 मध्येही सहभागी झाली होती. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असून 2017 मध्ये भाजप पक्षात सामिल होणारी रिमी आता काँग्रेसमध्ये पोहोचली आहे.