नवी दिल्ली : ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे. महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन सुरु होते. तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता. ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते, असे ते म्हणाले. दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित अल्पसंख्याक संमेलनात शरद पवार बोलत होते.
अनेकांनी या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही राजकीय नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींना या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मंडले. या चित्रपटावर नुकतच शरद पवार यांनी त्यांचे मत मांडले. ‘या चित्रपटामधून खोटा प्रचार केला जात आहे’, असंही त्यांनी म्हटलं.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल शरद पवार म्हणाले, ‘द काश्मिर फाईल्स चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, तसेच या चित्रपटातून खोटा प्रचार केला जातोय. देशातील परिस्थिती सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढताना देखील दिसतोय. पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांना देश एक ठेवणं महत्वाचं असतं. मात्र पंतप्रधान म्हणतात चित्रपट चांगला आहे.’
संमेलनात पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. देशात सांप्रदायिक शक्तीचा जोर वाढत आहे. या सर्व शक्तींच्या विरोधात लढण्याची आवश्यकता आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून खोटा प्रचार केला जात आहे. या चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले. भाजपा देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला.
There was no need to allow ‘The Kashmir Files’: Sharad Pawar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची तारीफ केली होती त्यावरही पवारांनी आक्षेप नोंदवला. काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावेळी व्ही. पी. सिंग सत्तेत होते. त्यांना भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद गृहमंत्री, राज्यपाल कोण हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्याचा मुद्दा तयार केला जातो. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झाले ते देशासाठी चांगले झाले नाही. त्या लोकांना इकडे यावे लागले ही चांगली गोष्ट नव्हती. पण जे झाले ते विसरून समाजात एकता कशी राहिल याचा विचार करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
‘अशा चित्रपटांना स्क्रिनिंगला परवानगीच दिली गेली नाही पाहिजे. असे असतानाच त्यांना कर मुक्ती दिली जात आहे. ज्यांनी देशाला एकत्र ठेवले पाहिजे ते सर्वांना हा चित्रपट पाहायला प्रोत्साहित करत आहेत. याने लोकांमध्ये राग निर्माण होईल. या चित्रपटाद्वारे देशात खोटं पसरवलं जात आहे. त्यामुळे देशातील वातावरण खराब होतंय’, अशी टीका शरद पवार यांनी तेथील आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
□ पंतप्रधान मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचं कौतुक केलं होते. अभिनेता सलमान खान, अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांनी देखील या चित्रपटाला पसंती दर्शवली. ‘द कश्मीर फाइल्स’ 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबतच दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.