मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. यानंतर या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी CID तपासाची मागणी केली आहे. ‘कार्डिलिया ड्रग्स प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच व एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकरचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे, मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांचा काल (१ एप्रिल) मृत्यू झाला. प्रभाकर साईलच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाकडून पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणातून चर्चेत आलेल्या प्रभाकर साईलचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. पण राष्ट्रवादीकडून त्याच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला. तसेच घातपाताची शक्यता राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलून दाखवली होती.
प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, तेथे आपण हजर होतो असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याने मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारदेखील केली होती. तसेच किरण गोसावी यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल याने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरदेखील काही गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आल्याचा दावा देखील त्याने केला होता.
Possibility of assassination of Prabhakar Sail in Aryan Khan drugs case, order of inquiry
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कार्डेलिया क्रुझवर कारवाई केल्यानंतर आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचा पंच असलेल्या प्रभाकर साईलची साक्ष नोंदवण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच प्रभाकर साईलने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली होती. तसेच प्रभाकर साईलने अनेक खळबळजनक आरोप केले होते. त्यामुळे प्रभाकर साईल चर्चेत आला होता.
मात्र प्रभाकर साईलचा शुक्रवारी हृदयविकाराच्या
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती. त्यामुळे अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाल्यामुळे शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. तसेच हा मृत्यू आहे की घातपात याबाबत चर्चा लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.
या मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे प्रभाकर साईल यांच्या आईला याबाबत कल्पना नव्हती. प्रभाकर यांच्या आई हिरावती साईल यांनी अचानक घडलेली घटना काही समजण्यापलीकडची आहे, असं म्हटलंय तर पत्नी पूजा साईल यांनी मला फोन आला मात्र कुणीतरी एप्रिल फुल बनवतंय असं वाटलं, असं सांगितलं.
प्रभाकरची आई हिरावती साईल यांनी म्हटलं की, माझं प्रभाकरशी बोलणं झालं होतं. पण हे अचानकच घडलं जे समजण्यापलीकडे आहे. मला याबाबत अधिकची काहीच माहिती नाही. हे ऐकल्यानंतर मला धक्काच बसला, मी घाबरुन गेलीय. त्याची तब्येत एकदम चांगली होती. असं कसं झालं काय माहीत? असं त्या म्हणाल्या.
प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितलं की, प्रभाकर स्वत: चालत गेले. त्यांचा ECG काढला गेला. डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला तिथलं सीसीटीव्हीही दाखवला. त्यात सर्व दिसत आहे. आम्हाला काहीही शंका नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, असं पूजा साईल म्हणाल्या.