मुंबई : मुंबईतील चर्नी रोड गिरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसं असावं हे पाहायला देशातीलच नाही तर परदेशातील लोकं इथे आली पाहिजेत, अशा प्रकारे मराठी भाषा भवनाचे काम करावे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे, असं यावेळी ठाकरे म्हणाले.
आमची भाषा कोणावर आक्रमण करणार नाही मात्र इतर भाषांचे मराठीवर आक्रमण नको असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. मुंबईमध्ये शनिवारी गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणीही यावं आणि आमच्या उरावर नाचावं एवढे काही आम्ही छत्रपतींचे मावळे दिलदार नाहीत की अत्याचार सहन करावा. मराठी भाषा ही छत्रपतींच्या तलवारीप्रमाणे तळपली पाहिजे.’ कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात मराठी भाषिकांवर जो भाषिक अत्याचार होतोय तो कदापी सहन करता कामा नये. तिथल्या मराठी भाषिकांच्यामागे आपण ठामपणे उभे राहिलो पाहिजे. तिथली मंडळी जर मातृभाषेत बोलायचा हक्क असताना तो डावलून त्यांच्यावर भाषिक अत्याचार होणार असेल तर तो आम्ही चालू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.
Bhumi Pujan of Bhasha Bhavan at the hands of Chief Minister
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी मराठी भाषिकांनी तीव्र संघर्ष केला होता. या लढ्यात प्रबोधनकार अग्रणी होते. मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतर मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करण्याचं काम शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने केलं. यामुळे मुंबईमध्ये मराठी भाषा भवनासाठीच्या पाटीवर प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री म्हणून माझं नाव लागलं, यापेक्षा आयुष्याचं सार्थक कोणतं असेल अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली भावना व्यक्त केली.
आपण जे करतोय ते जगातील सर्वोत्तम असायला हवं. मराठी भाषेची श्रीमंती जगाला कळाली पाहिजे. मराठी शाळेत भाषा शिकवली गेलीच पाहिजे यासाठी कायदा करावा लागतो, मराठी भाषेत फलक असलेच पाहिजे हा कायदा करावा लागतो. ही वेळ आपल्यावर कोणी आणि का आणली याचा विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. मराठी भाषेची ताकद ओळखू शकत नाही हे मराठी भाषेचे नाही आपले दुर्भाग्य आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
‘गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज’ अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
□ राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आणि सेनेकडे गृहमंत्रीपद जाणार?
महाविकास आघाडीत सध्या धुसफूस सुरु असल्याची माहिती आहे. शिवसेनेने गृहमंत्रीपद आपल्याकडे मागितल्याने बैठका सुरु झाल्या आहेत. यावर बोलतांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद हवे असल्याची चर्चा अधिवेशनात सुरु होती. दरम्यान, शिवसेनेला गृहमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळणार का? याबाबत चर्चा सुरु आहे.
शिवसेना गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडे असलेलं गृहखातं सेनेला मिळावं, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भावना आहे. गृहखातं भाजपबद्दल सॉफ्ट असल्यानं शिवसेनेची तीव्र नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.
》 गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक ठिकाणी निघाल्या शोभायात्रा
#शोभायात्रा
#gudipadwa #पुणे #मुंबई #mumbai #pune #surajyadigital #सुराज्यडिजिटल #parade
मागील दोन वर्षांपासून कोरोनाची साथ आणि त्या अनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. परंतु यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, दादर, गिरगाव, डोंबिवली या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा निघाल्या आहेत. तर कुठे लेझीम वाजवून, गाणी लावून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.