Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

नमाज पठणाची वेळ वाढविण्यावरुन दगडाने मारहाण, सातजणांवर गुन्हा दाखल

रस्त्यावर वाढदिवस साजरा; तरुणासह तिघांवर गुन्हा

Surajya Digital by Surajya Digital
April 6, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
नमाज पठणाची वेळ वाढविण्यावरुन दगडाने मारहाण, सातजणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बार्शी : नमाज पठणाची वेळ वाढविण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात झाले. यात सातजणांनावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यात घडली.

फारूख रज्जाक सौदागर (रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांना कोयता आणि दगडाने मारहाण झाली. त्यांच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पीटल येथे उपचार चालू आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वहाब ईस्माईल सौदागर , आयाज ईस्माईल सौदागर, शहानवाज वहाब सौदागर, रेहान फयाज सौदागर , मुस्तकीन आयाज सौदागर, फरहान रियाज सौदागर, सर्फराज वहाब सौदागर   (सर्व रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवार पेठेतील नुरी मशिदीमध्ये सायंकाळी 05/00 वाजणेचे सुमारास रोजा सोडण्याकरिता व नमाजाकरीता सर्वजण जमले होतो. त्यावेळी वहाब ईस्माईल सौदागर व आयाज ईस्माईल सौदागर यांनी नमाज पठण करावयाचा वेळ वाढवा, असे म्हणून मशीदचे ट्रस्टी फरीद खलील सौदागर व फिर्यादी सोबत शिवीगाळी व बाचाबाची केली.

त्यानंतर उपवास सोडून नमाज पठण करून सर्वजण आपापले घरी गेले. त्यानंतर रात्री 10/00 वा. चे सुमारास सायंकाळी  मशिदीत झालेली तक्रार मिटवणे करीता फिर्यादी, जुबेर महेताब सौदागर व सद्दाम फरीद सौदागर असे तिघेजण आयाज सौदागर यांचे घराकडे जात असताना आयाज हा विठठल परदेशी यांचे घराचे समोर रोडवर थांबला असल्याने ते त्याचेजवळ गेले. त्यास रमजानचा पवित्र महिना चालू आहे, उगाच आपल्या आपल्यात भांडण, तक्रारी नको, आपण मिटवून टाकू असे म्हणत समजूत घालत होते.

Stone pelting for extending Namaz recitation time, case filed against seven persons

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याचवेळेस आयाज याने भाऊ, पुतणे व नातेवारईकांना हाका मारुन लवकर या, फारुख आयता आला आहे, याला आता संपवूनच टाकू असे म्हणताच या सर्वानी कोयता, काठी, दगड घेवून आले. त्यांनी फिर्यादीस जबर मारहाण केली. ते खाली पडल्यानंतर जुबेर सौदागर व सद्दाम सौदागर हे सोडविण्याकरीता मध्ये आले असता त्यांना देखील लाथा बुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

□ रस्त्यावर वाढदिवस साजरा; तरुणासह तिघांवर गुन्हा
सोलापूर : सार्वजनिक रोडवर रहदारीस अडथळा निर्माण करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी तरुणासह तीन जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना दि. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चंडक हायस्कूल गेट समोर घडली.
याप्रकरणी पोलीस नाईक नारायण चंद्रकांत सांगळे यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  फिर्यादीवरुन सुमित विजय शिवशरण (वय-२५, रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर) व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चंडक हायस्कूल न्यू बुधवार पेठ सोलापूर येथील सार्वजनिक रोडवर रहदारीस अडथळा निर्माण करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धोका निर्माण होईल अशा रीतीने वाढदिवस साजरा करतांना वरील संशयित आरोपी मिळून आले आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक कटके हे करीत आहेत.

 

Tags: #Stone #pelting #extending #Namaz #recitationtime #casefiled #seven #persons#नमाज #पठण #वेळ #दगडाने #मारहाण #सातजणांवर #गुन्हा
Previous Post

कायद्याच्या दुरूपयोगावरून राज्यसभेत संजय राऊत अन् अमित शहा यांच्यात रंगला सामना

Next Post

सोमय्या पिता पुत्रावर मुंबईत गुन्हा दाखल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोमय्या पिता पुत्रावर मुंबईत गुन्हा दाखल

सोमय्या पिता पुत्रावर मुंबईत गुन्हा दाखल

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697