मुंबई : आज भाजपचा 44 वा स्थापना दिवस आहे. जनसंघातील अंतर्गत कलहामुळे बाहेर पडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी या मातब्बर नेत्यांनी भाजपची 6 एप्रिल 1980 रोजी स्थापना केली. भाजपला 1984 च्या लोकसभेत केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या निवडणूकीत भाजपने 300 च्यावर जागा जिंकून सरकार स्थापन केले आहे.
भाजप हा 1990 नंतर राज्यसभेत 100 चा आकडा गाठणारा पहिला पक्ष ठरला आहे. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. यानंतर भाजपने प्रथमच राज्यसभेत 101 सदस्यांचा टप्पा गाठला आहे. 32 वर्षे वरिष्ठ सभागृहात राहूनही कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता आलेला नाही. दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे आता राज्यसभेत 117 सदस्य आहेत.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या भाजपला 1984 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढवत 1998 मध्ये 182 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला. भाजपने 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये त्यांच्या जागांची संख्या 300 च्या पुढे गेली.
Today is BJP’s 44th founding day, from two seats to over 300 seats
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
केवळ 3 मतांमुळे बहुमताच्या सरकारमधून वाजपेयी आणि अडवाणी यांना बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसानंतर भाजपची स्थापना झाली. अडवाणींनी भाजपची स्थापना कशी झाली ते सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘1980 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातील संघविरोधी मोहिमेने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. याचा काँग्रेसला स्पष्टपणे फायदा झाला आणि निवडणुकीत जनता पक्षाची कामगिरी खालावण्याचा प्रयत्न झाला.
एप्रिलमध्ये नवी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुहेरी सदस्यत्वाबाबत अंतिम निर्णय होणार होता. परंतु जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने 17 ने तडजोडीचा फॉर्म्युला फेटाळून लावला. 14 च्या बाजूने मतदान झाले आणि माजी जनसंघ सदस्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं केंद्रात आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. मात्र, त्यांना विरोधकांच्या अविश्वास ठरावालाही सामोरं जावं लागलं. अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी वाजपेयींनी संसदेत शानदार भाषण केलं. या दिवशी त्यांनी भाजपविषयी आपलं मत व्यक्त केलं.
संसदेतील भाषणात ते म्हणाले, भाजपची उभारणी करण्यासाठी आम्ही खूप तपश्चर्या केलीय. भाजप कोण एकाची पार्टी नाहीय, तर प्रत्येक सदस्याचा तो पक्ष आहे. विरोधक संसदेतून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. देशाच्या भल्यासाठी त्यांचंही स्वागत आहे. आपणही आपल्या परीनं देशाची सेवा करत आहोत. आम्ही नि:स्वार्थीपणे देशाची सेवा केलीय. राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या या प्रयत्नांमागं 40 वर्षांची साधना आहे. हा काही चमत्कार नाहीय. भाजपनं खूप मेहनत घेतलीय. भाजप हा 365 दिवस टिकणारा पक्ष आहे, असंही ते म्हणाले होते.