मुंबई/ पुणे : वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील, तर त्यांचं पक्षात स्वागत आहे, असं राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी वसंत मोरे पक्षांतराचा निर्णय घेणार का?, अशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मोरे यांची आज मनसे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.
वसंत मोरे यांना (7 एप्रिल) मनसेने पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले. त्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन केला आहे. यावेळी उध्दव ठाकरेंनी वसंत मोरे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी हनुमान चालिसा लावणार नाही, या विधानामुळे मनसेने वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती.
राज ठाकरे यांनी ज्यावेळेपासून मशिदीवरील भोंग्यावर वक्तव्य केले आहे. त्यावेळेपासूनच वसंत मोरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे पुण्यातील मनसेचे वातावरण अधिकच चिघळले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्धचा आदेश नाकारल्यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवले गेले. त्यांना त्या पदावरुन हटवले गेले असल्यामुळे भविष्यात याचा फटका वसंत मोरे यांना बसणार की मनसेला बसणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
मनसेच्या मशिदीवरील भुमिकेनंतर होत असलेल्या राजकारणामुळे अनेक घडामोडी घडत आहेत. पूर्वी मनसेत असलेल्या रुपाली पाटील यांनीही वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टला त्यांच्या समर्थकांनी उत्तर दिले आहे. भावी आमदार तुम्हीच असल्याच्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यावर ताईंनी राजकीय आत्महत्या केली असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर आता रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया देताना माझी राजकीय आत्महत्या होती परंतु तुमची मनसेत हत्या झाली असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
Pune: Offer of Shiv Sena along with NCP to Vasant More
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
वसंत मोरे शहराध्यक्ष होते, लोकप्रतिनिधी होते मी त्यांच्यासोबत काम केले आहे. अनेक वेळा खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे. या मनसेच्या अंतर्गत खेळीला वैतागून मनसेचा राजीनामा दिला होती. तेव्हा वसंत मोरे म्हणाले होते की, ताईंची राजकीय आत्महत्या आहे. वसंतभाऊ तुमची हत्या केली की आत्महत्या आहे हे सर्व महाराष्ट्र पाहतो आहे अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे.
‘वसंत मोरे राष्ट्रवादीत आले तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. मात्र, खुद्द वसंत मोरे यांनी आपण मनसे सोडणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. तसंच माझी या पदावरुन हकालपट्टी केली नसून माझ्या या पदाचा कार्यकाळ संपल्याने ही जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली असल्याचं मोरेंनी सांगितंल आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मोरे नाराज असून ते आपल्या पक्षात येतील का? यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच वसंत मोरेंना शिवसेनेमध्ये येण्याबाबत पुनर्विचार करावा असा सल्ला दिला आहे.
युवा सेनेचे नेते वरुन देसाई यांनी वसंत मोरे यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.