मुंबई : शरद पवारांनीच ST ची दुरावस्था केली आहे, तसेच कोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही, अशा प्रतिक्रिया देत मोठ्या संख्येने जमलेल्या ST कर्मचारी पवारांच्या घरासमोर जमले आहे. त्यांनी पवारांच्या घरावर चपला फेकल्या आहेत. काल कोर्टाने निवृत्ती वेतन लागू केले होते, पण मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच रोषातून आज कर्मचाऱ्यांनी मुंबईत आंदोलन सुरु केले आहे.
गेल्या 5 महिन्यांपासून झालेले ST कर्मचाऱ्यांनी आज पवारांच्या घरी चप्पलफेक, दगडफेक केली. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत. या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध घेणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, यानंतर ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असलेले आझाद मैदान पोलिसांनी सील केले आहे.
संतप्त ST कर्मचारी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसले आहेत. पवारांच्या घराच्या आवारात घुसून कर्मचाऱ्यांनी घरावर चप्पलफेक, दगडफेक केली आहे. यानंतर सुप्रिया सुळे या घराबाहेर येऊन त्यांनी शांततेची विनंती केली. तरी कर्मचारी ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. दरम्यान, थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
राज्याचं लक्ष लागून असलेल्या आणि गेल्या पाच-सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर काल, गुरुवारी उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. विलिनीकरणाची मागणी सोडली तर संपकरी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने कबूल केल्या आहेत. यानंतरही आज संपकऱ्यांच्या एका मोठ्या गटाने शरद पवारांच्या मुंबईतील घराच्या परिसरात येऊन जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर चप्पला आणि दगड भिरकावले. तसंच, येत्या १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
Entering the premises of Sharad Pawar’s house and throwing sandals and throwing stones; Serious allegations against Sharad Pawar
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज सिल्वर ओक परीसरात आक्रमक झाल्याचे दिसून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आणि ते थेट पवारांच्या घराच्या परिसरात घुसले. ही एवढी मोठी घटना म्हणजे राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्याचं मानलं जातंय.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पण तरीही आंदोलक त्यांच्या घराच्या परिसरात आले आणि त्या ठिकाणी चप्पल फेक करत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. हे पोलीस यंत्रणा असेल वा राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कसं काय समजलं नाही, किंवा त्याची कुणकुण कशी काय लागली नाही याचे आश्चर्य व्यक्त केलं जातं. पोलिसांना या घटनेचा अंदाज कसा आला नाही, ही गोष्ट कशी समजली नाही असा सवाल रायगडचे खासदार सुनिल तटकरेंनी केला आहे.
● शरद पवारांवर गंभीर आरोप
एसटी महामंडळाचं शोषण फक्त आणि फक्त शरद पवार यांच्यामुळेच होत आहे. शरद पवारच आमच्या शोषणाला जबाबदार आहेत. आमच्या १२५ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याला चोरांचे पुढारी आणि भ्रष्टाचारानं बरबटलेले शरद पवारच याला जबाबदार आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्या घरावर चप्पला भिरकावल्या आहेत, असं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच, येत्या १२ एप्रिलला आम्ही बारामतीला धडकणार आहोत. पवारांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन करणार आहोत, हिंमत असेल तर आम्हाला रोखूनच दाखवा, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय.
□ माझ्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी – सुप्रिया सुळे
गेल्या पाच महिन्यांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांनी आज आपला मोर्चा शरद पवार यांच्या घराकडे वळवला. यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचा अनेक नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. माझ्या घरावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ही अशी पहिलीच घटना असेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. दरम्यान, दोषींवर कारवाई होणार, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.
गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय.
● ठळक घडामोडी
– शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
– पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात
– पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पवारांच्या घरी पोहोचले
– हा कर्मचाऱ्यांच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे: अतुल भातखळकर
– पवारांच्या घरावर जाणं निंदनीय : छगन भुजबळ
– अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा प्रकार, अज्ञात शक्ती हालचाली करत आहे: संजय राऊत