Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

भाजप आमदाराविरुद्ध टिप्पणी केल्याने पोलिसांनी पत्रकारांचे काढले कपडे

एका पत्रकाराने ट्वीट केल्याने मिळाली माहिती

Surajya Digital by Surajya Digital
April 9, 2022
in Hot News, देश - विदेश
0
भाजप आमदाराविरुद्ध टिप्पणी केल्याने पोलिसांनी पत्रकारांचे काढले कपडे
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात सिधी जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार आणि युट्युबर यांच्यासह 8 जणांना अर्धनग्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. नीरज कुंदेर या कलाकाराला भाजप आमदार केदार शुक्ला आणि मुलगा गुरुदत्त यांच्या विरोधात अपमानजनक टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अटकेला पत्रकार व काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही अटक केली व अर्धनग्न केले.

नीरज कुंदेर नावाच्या थिएटर कलाकाराने भाजप आमदार केदारनाथ शुक्ला आणि त्यांचा मुलगा गुरू दत्त विरोधात अवमानजनक टिपण्णी केल्यामुळे त्यांना अटक केली होती. एका नकली अकाऊंटच्या माध्यमातून टिपण्णी केली होती. गुरूवारी (ता.7) फोटो व्हायरल झाले. त्यामुळेच हा संतापजनक प्रकार उजेडात आला.

या प्रकारावर कोतवाली पोलिस स्टेशनचे इनचार्ज मुकेश सोनी यांनी सांगितले की, नीरज कुंदर यांनी नकली फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून अनेकदा अवमानजनक टिपण्णी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र नीरज कुंदर या थिएटर कलाकाराला अटक केल्यानंतर कनिष्क तिवारी नावाच्या युट्यूब पत्रकारासह काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कलाकाराच्या अटकेविरोधात पोलिस ठाण्यात घोषणाबाजी केली.

पोलिस आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र पोलिसांनी युट्यूब पत्रकारासह आठ जणांचे कपडे काढून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर या सर्वांचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पत्रकार रणविजय सिंह यांनी या प्रकरणावर ट्वीट केले आहे. त्यात दावा केला की, हे मध्य प्रदेशातील यु-ट्यूब पत्रकार आहेत. त्यांनी भाजप आमदाराच्या विरोधात बातमी चालवली. त्याबद्दल पोलिसांनी त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत उभे केले.

Police strip journalists of their clothes after making remarks against a BJP MLA

जानता हूं इनका अपराध अक्षम्य है, गुनाह-ए-अज़ीम है. पत्रकार होकर खबर कर रहे हैं. महापाप!

फिर भी गुजारिश करने की गुस्ताखी कर रहा कि थोड़ी रियायत दी जाए. रहम अता की जाए.

इनके घरों पर बुलडोजर चलवाकर इन्हें जाने दिया जाए.

महान कृपा होगी 🙏 https://t.co/ea30glFPYg

— Ranvijay Singh (@ranvijaylive) April 7, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

रणविजय सिंह यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटले आहे की, या पत्रकारांचा गुन्हा मोठा आहे. सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण त्यांनी पत्रकार असतानाही बातमी चालवली. हे महापाप आहे. परंतू तरीही त्यांना थोडा दिलासा देण्याची मागणी करून मूर्खपणा करत आहे. त्यांच्यावर कृपा करावी. त्यांच्या घरावर बुलडोजर चालवून यांना सोडून देण्यात यावं, ही मोठी कृपा होईल, असे रणविजय सिंह यांनी म्हटले आहे.

भदोही वल्लभ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नव्या भारताचा हा बुलंद फोटो आहे. या फोटोत दिसणारे अर्धनग्न लोक हे मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील पत्रकार आहेत. दाढीसह बाजुला उभे असलेले पत्रकार कनिष्क तिवारी आहेत. ते युट्यूब चॅनल चालवतात आणि फ्रीलान्सींग करतात. त्यांचा गुन्हा हा आहे की, त्यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार केदारनाथ शुक्ला यांच्याविरोधात बातमी चालवली.

यापुढे म्हटले आहे की, त्यांचे फक्त कपडे उतरवले नाहीत. तर त्यांची धिंड काढली. याबरोबरच भदोही वल्लभ यांनी दावा केला आहे की, कनिष्क तिवारी यांनी विरोधात बातमी चालवली. त्यामुळे आमदार शुक्ला यांनी पोलिस ठाण्यातून कनिष्क तिवारी यांना पकडून आणण्यासाठी पोलिस पाठवले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केले. तर 18 तास सर्वांना अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात उभे केले, असा दावा पत्रकार भदोही वल्लभ यांनी केला आहे.

मात्र या प्रकारावर मुकेश सोनी या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सामान्य तपासणीसाठी या सर्वांचे कपडे काढले होते. त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही. याबरोबरच आम्हाला माहिती मिळाली होती की, युट्यूब पत्रकार ब्लॅकमेल करत होता. त्याबाबत अनेकवेळा त्या पत्रकाराला विचारणा केली. मात्र त्याने पोलिस ठाण्यात धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Tags: #Police #strip #journalists #clothes #making #remarks #BJP #MLA#भाजप #आमदार #टिप्पणी #पोलिस #पत्रकार #कपडे
Previous Post

अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी 35 नोकर असताना चोरी; दीड कोटींचा ऐवज लंपास

Next Post

पृथ्वीराज पाटील ठरला महाराष्ट्र केसरीचा विजेता; महाराष्ट्र केसरी- गतविजेता हर्षवर्धन पराभूत

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पृथ्वीराज पाटील ठरला महाराष्ट्र केसरीचा विजेता; महाराष्ट्र केसरी- गतविजेता हर्षवर्धन पराभूत

पृथ्वीराज पाटील ठरला महाराष्ट्र केसरीचा विजेता; महाराष्ट्र केसरी- गतविजेता हर्षवर्धन पराभूत

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697