मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरात चोरी झाली आहे. 1.41 कोटींचे दागिने आणि रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. या प्रकरणी सोनमच्या सासू प्रिया आहुजा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आहुजा यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
सोनम आणि आनंद यांच्या दिल्लीमधील घरात घुसून चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये रोकड आणि दागिन्यांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहूजा यांच्या दिल्लीतील घरातून जवळपास 1 कोटी 41 लाख रुपयांची चोरी झाली आहे. त्यामुळे अहूजा कुटुंब मोठ्या संकटात आहेत.
आनंद आहुजाची आजी सरला आहुजा यांनी तुघलक रोड पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोनम कपूर हिच्या सासरी जवळपास 35 नोकर काम करतात. आता पोलीस या सर्वांची चौकशी करू शकतात. घरातील 35 जणांवर पोलिसांचा संशय आहे. रिपोर्टनुसार, ही घटना फेब्रुवारीमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या दिल्लीतील घरात घडली होती.
सोनम कपूरची 86 वर्षीय आजी सासू सरला आहुजा, सासरे हरीश आहुजा आणि प्रिया आहुजा या दिल्लीत राहतात. सरला आहुजाचे मॅनेजर रितेश गौरा यांनी 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या घरातील कपाटामधून 1 कोटी 40 रुपयांचे दागिने आणि 1 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी त्याच्या घरातील 25 नोकर, 9 केअरटेकर, ड्रायव्हर आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या इतर लोकांची पोलीस चौकशी करू शकतात.
Actress Sonam Kapoor’s house burglarized with 35 servants; Lampas looted Rs 1.5 crore
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना फेब्रुवारीमध्ये सोनम आणि आनंदच्या दिल्लीतील घरात घडली होती. सोनमची ८६ वर्षीय आजी सरला, अभिनेत्रीचे सासरे हरीश अहुजा आणि प्रिया अहुजा दिल्लीत राहतात. सरला यांचे व्यवस्थापक रितेश गौरा यांनी २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या घरातील कपाटातून १.४ कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या अहवालात असेही म्हटले आहे की पोलिसांनी या प्रकरणात त्यांच्या घरातील २५ नोकर, नऊ केअरटेकर, ड्रायव्हर आणि काम करणाऱ्या इतर लोकांची चौकशी केली. ११ फेब्रुवारीला सरला यांनी तब्बल दोन वर्षांनंतर त्यांचं कपाट तपासल्याचं सांगितलं. त्यानंतर आपले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर या प्रकरणी त्यांनी २३ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली.
तक्रारीनंतर पोलिसांनी सोनम आणि आनंद अहूजाच्या घरातील लूटल्या गेलेल्या पैशाचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फूटेजही चेक करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यातही, सोनमच्या सासऱ्यांना २७ करोडचा गंडा लावण्यात आला होता. या केसचीही भलतीच चर्चा रंगली होती. या प्रकरणात आतापर्यंत दहा लोकांना अटक करण्यात आली आहे. सध्या सोनम कपूर आणि आनंद अहूजा मुंबईत आहेत. लवकरच सोनम एका बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती आपल्या वडीलांच्या घरी असल्याचं बोललं जात आहे.