मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्तेना 11 दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला केला. या कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. सुनावणीच्या वेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मोठमोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणी ४ नवीन लोकांना अटक केली आहे तर एकाच शोध सुरु आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास घेण्यासाठी सदावर्ते यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी काल रविवारी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यात नेमके काय सापडले याची माहिती मिळू शकलेली नाही. आंदोलन करणारे निदर्शक खरोखरच एसटीचे कर्मचारी होते की आणखी कोणी बाहेरचे लोक त्यात सहभागी झाले होते याची माहिती पोलिसांनी घेतली आहे.
सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सदावर्तेंची पोलीस कोठडी संपली होती यामुळे त्यांना किला कोर्टात पुन्हा हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी सदावर्ते यांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. सदावर्ते यांच्याविरोधात काही पुरावे असून अजून चौकशी करायची असल्याची मागणी केली होती.
Lawyer Sadavarte’s stay in custody extended, Puri also taken into custody
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सुनावणीदरम्यान सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते पुढील २ दिवस पोलीस कोठडीत असतील. त्यांची पोलीसांकडून चौकशी करण्यात येईल.
वकील गुणरत्न सदावर्ते यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पोलिसांना तपासादरम्यान काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. यामुळे ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.
परंतु कोर्टाने सदावर्तेंची पुढील २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ८० लाख रुपये जमा केले असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे. तसेच हे पैसे कोणी घेतले आणि कोणाला वाटण्यात आले? याचा तपास करायचा आहे. तसेच हल्ल्याच्या दिवशी आणि आदल्या दिवशी सदावर्तेंच्या संपर्कात एक-दोन व्यक्ती होते. या व्यक्तींची समोरा-समोर चौकशी करायची असल्यामुळे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मुंबई पोलीस आता पुढील दोन दिवस सदावर्ते यांची आरोपींशी समोरा समोर बसवून चौकशी करणार आहेत.
□ सच्चिदानंद पुरीला घेतले ताब्यात
एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यात सच्चिदानंद पुरी या आरोपीचाही समावेश असल्याचा आरोप मुंबई पोलिसांकडून करण्यात आला होता. तसेच सच्चिदानंद पुरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात सच्चिदानंद पुरी सदावर्ते यांच्या संपर्कात होता असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पुरीसह आणखी ३ आरोपी या प्रकरणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
□ नागपुरातून येत होते फोन
सदावर्तेंना नागपूरमधून एक फोन आला त्याचे नाव सांगू शकत नाही तर तो फोन कोणाचा होता हे तपासात समोर येईल. तसेच फडींग गोळा केले त्यातून घोटाळा केला असल्याचा दावा सकारी वकील घरत यांनी केला आहे. तसेच १२ एप्रिलला बारामती काही होणार असल्याचे वक्तव्य करण्यात येत होते. परंतु हे पोलिसांना भ्रमित करण्यासाठी बोलण्यात येत होते असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केला आहे.
□ सातारा पोलीस घेणार ताब्यात
सातारा पोलीस सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी आले होते. आज जर सदावर्ते यांची सुटका झाली असती तर सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला असता. दीड दोन वर्षापूर्वी सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे १३ तारखेला सदावर्ते यांची सुटका झाली की, सातारा पोलीस सदवार्तेना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
□ पीआय तडकाफडकी निलंबित
एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या वेळी उशिरा पोहोचल्याचा पोलिसांवर ठपका ठेवण्यात येत होता. यासंदर्भात पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या विभागीय चौकशीमध्ये गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्यारेलाल राजभर यांना दुपारी १२ वाजताच या आंदोलनाची माहिती मिळाली होती, असे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले नाही तसेच ते स्वतःही घटनास्थळी गेले नाहीत. पोलिसांनी यासंदर्भातील अहवाल गृहमंत्रालयास दिल्यानंतर राजभर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.