पुणे : मुलांना शाळेत सोडायला निघालेल्या रिक्षाचा अपघात झाला आहे. या अपघातात 8 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही मुले येथील बोरीभडक गावच्या हद्दीत राहणारी आहेत. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर उरूळीकांचन येथील खेडकर मळा येथे झाला. दरम्यान, या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना उरूळी कांचन येथील विद्यालयात सोडण्यासाठी जाणा-या एका रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षामधील जवळपास ११ विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे.
शाळा सुरु झाल्यापासून हे विद्यार्थी नेहमीप्रमाणे बोरीभडक येथून रिक्षाने उरुळी कांचन येथील विद्यालयात जात होते. यावेळी उरूळीकांचन जवळ असतांना रिक्षाला पाठीमागून येणा-या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली.
Pune – Solapur highway rickshaw accident, 8 students injured
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
धडक ऐवढी जोरदार होती की रिक्षा रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यावेळी रिक्षा चालक संदिप कोळपे हा जमीनीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. तर काही विद्यार्थ्यांना किरकोळ तर काहिंना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर उरुळी कांचन येथील येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
□ वाचा जखमींची नावे
जखमी विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही. या अपघातात संदिप कोळपे (रा. बोरी भडक, ता. दौंड , जि. पुणे) हा रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. तर अंकुश येलभारे (वय १३), मानसी चंद्रमोहन कोळपे (वय १५), भक्ती बापुराव शिंदे (१५), वैष्णवी आप्पासाहेब गव्हाणे, तनुजा चंद्रमोहन कोळपे (१०), मयूरी शिंदे (वय १०), अमर शिंदे (वय १२), हर्षल वाघमारे (वय १४ , सर्व रा. बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यातील काही विद्यार्थी हे महात्मा गांधी महाविद्यालयात तर एक विद्यार्थिनी वैष्णवी ढवळे ही स्वामी विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणारी आहे.