नवी दिल्ली : देशात चार विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा पाचही जागांवर पराभव झाला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्याची आज मतमोजणी झाली. त्यात भाजपला धक्का बसला. लोकसभेत भाजपचे बळ एकने कमी झाले आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या खासदार संख्येत एकाची भर पडली आहे.
देशात चार विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपला धक्का बसला आहे. भाजपला सर्व पाचही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्याची आज मतमोजणी झाली. त्यात भाजपला धक्का बसला आहे. लोकसभेत भाजपचे बळ एकने कमी झाले आहे. तर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार संख्येत एकाची भर पडली आहे.
पश्चिम बंगालमध्ये आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक झाली. आसनसोल लोकसभेतून निवडून गेलेले खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर बालीगंज विधानसभेच्या आमदारांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. तृणमूल काँग्रेसने भाजपचे माजी खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांना भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचे आव्हान होते.
शत्रुघ्न सिन्हा यांना दुपारी दोन वाजेपर्यंत 5 लाख 45 हजार 818 मते मिळाली. तर, भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांना 3 लाख 15 हजार 283 मते मिळाली. तिसऱ्या स्थानावर असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पार्थ मुखर्जी यांना 73, 808 मते मिळाली. शत्रुघ्न सिन्हा यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बाबुल सुप्रीयो यांनी 20 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. बाबुल सुप्रीयो यांना 50 हजार 722 मते मिळाली. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार सायरा शाह हलीम यांना 30 हजार 818 मते मिळाली. भाजप उमेदवाराला 12 हजार 967 मते मिळाली.
BJP defeated in by-elections, losing by five seats
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बोचहां विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अमर कुमार पासवान यांनी विजयी झाले आहे. त्यांच्या समोर भाजप उमेदवाराचे आव्हान होते. अमर पासवान यांनी भाजप उमेदवार बेबी कुमारी यांचा 36 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. राजद उमेदवार अमर पासवान यांना 82 हजार 562 मते मिळाली.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे पराभूत उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे.
□ देशातील पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, पाहा निकाल
देशात चार विधानसभा आणि लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे.
– बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बाबुल सुप्रियो विजयी
– शत्रुघ्न सिन्हा 3 लाख मतांनी विजयी.
-बिहार- राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अमर कुमार पासवान विजयी
– महाराष्ट्र काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय.