अक्कलकोट : ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व प्राप्त असलेल्या गौडगांव येथे हजारो भाविकांनी हजेरी लावली. जय जय श्रीराम … पवनपुत्र हनुमान की जय चा गजर करीत आलेल्या भाविकांनी जागृत मारूतीचे दर्शन व महाप्रसाद घेतला, ज्यांचे मनोकामना पूर्ण झाले. ते असंख्य भाविकांनी नवस फेडले. भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिर समितीकडून व्यवस्था केली होती.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त गौडगांव येथील जागृत मारूती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य राज्यातून लाखो भाविक भक्तांनी दक्षिण मुखी जागृत मारूतीचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला. गौडगांव येथील समर्थ रामदास स्वामींंच्या कालखंडात स्थापित झालेला व नवसाला पावणारा दक्षिणमुखी श्री जागृत मारूतीच्या दर्शनासाठी शनिवारी राज्य व परराज्यातुन लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी “रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय, जय जय बजरंग ” अशा विविध घोषणांनी गौडगावची पहाट उजाडली होती.
गौडगावच्या पुरातन हेमांडपंती जागृत मारूती मंदिरात मारूतीचा मंत्रोचारात अभिषेक, होमहवन, शनिपुजा, महाआरती विविध पूजा झाली. या पूजेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. गौडगांव अन्नछत्र मंडळात मारूतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिणमुखी जागृत मारूतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातून आलेले हजारो भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी पहाटे पासून मंदिरात अलोट गर्दी केली होती. नवसाला पावणा-या मंदिराची महंती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचल्याने राज्य परराज्यातून भाविक येतात.
Hanuman Jayanti celebration at Gaudgaon South facing Jagrit Maruti Temple
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रामभक्त हनुमान की जय,पवनसुत हनुमानजी की जय ,जय बजरंग अशा विविध घोषणांनी गौडगांवची पहाट उजडली होती. जागृत मारुती मंदिरात पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला. अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात व फटाक्यांच्या अतिषबाजीत सूर्योदयाच्या वेळेस जन्मोत्सव संपन्न झाला.
पहाटे हनुमानाच्या मूर्तीस महाभिषेक, हनुमान चालीसा पाठ, रामनामाचा जप व आरती करून विधिवत पुजा झाली. गाभारा व मूर्तीला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. पहाटे पासून अभिषेकाला प्रारंभ झाला.
शेकडो भाविकांनी पुष्पवृष्टी करून व पाळणा हलवून संकटमोचन हनुमान की जय, जय श्रीराम… जय श्रीराम… च्या जयघोषात हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, तर मंदिरा बाहेरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मोत्सव सोहळा पार पडला. जन्मोत्सव निमित्त जागृत मारूती मंदिरात भक्तांनी पहाटे ३ ते सकाळी ८ या वेळेत मारूतीला रुद्राभिषेक तर भक्ताच्या हस्ते होमहवन करण्यात आले. यावेळी श्रीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी ६ वाजता पाळणा, आरती, नैवेद्य अर्पण असे कार्यक्रम पार पडले.
हजारो भक्तांनी हनुमान चालीसा, मंत्रमंठण करून मंदीर परिसरात भक्तीचा माहोल निर्माण केला. अन्नछत्र मंडळात महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी लाखो भाविक महाप्रसाद घेत तृप्त झाले. आज शनिवारी पहाटे पासून सुरू झालेली भाविकांची गर्दी मध्यरात्री पर्यंत कायम होती. मंदिर कळसावरील आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता. यावेळेस अध्यक्ष श्रीकात खानापुरे, कार्याध्यक्ष सिद्राम वाघमोडे, सचिव प्रकाश म्हेंथे, ज्ञानेश्वर फुलारी, परमेश्वर सुतार, परमेश्वर पाटील, बिराप्पा पुजारी, शांतच्या स्वामी,चौडप्पा सोलापुरे आदीसह परिश्रम घेतले.