सांगली : कर्नाटक परिवहन मंडळाने अपघाताची नुकसान भरपाई न दिल्याने सांगली कोर्टाने बस जप्तीचे आदेश दिले होते. 2015 साली मिरजमध्ये कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस धडकेत दुचाकीस्वार भानुदास भोसलेंचा मृत्यू झाला होता. कोर्टाने 2016 साली भोसले कुटुंबियांना 8 लाख 33 हजार 553 रु. भरपाई द्यावी, असा आदेश कर्नाटक परिवहन मंडळाला दिला होता. पण वारंवार सांगूनही आदेशाची पुर्तता न केल्याने आता बस जप्तीची कारवाई केली आहे.
याबाबत मृत भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांनी सांगली न्यायालयामध्ये सदरची बाब निदर्शनास आणून दिली असता,सांगली न्यायालयाने थेट एसटी महामंडळाची बस जप्त करून नुकसान भरपाई वसुल करण्याचे आदेश सुनावले. त्यानंतर सांगली न्यायालयाच्या बेलीफकडून सांगली एसटी डेपोतुन कर्नाटकची एसटी बस जप्त करत मृत भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षात या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे श्रीमती भोसले यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली. तेव्हा आदेशानंतरही भरपाईची रक्कम न दिल्याने अपघातातील बस किंवा कर्नाटक एसटी महामंडळाच्या मालकीची कोणतीही बस जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच बसच्या चाव्या श्रीमती भोसले यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.
Sangli court seizes Karnataka government’s bus for non-payment of damages
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भानुदास भोसले असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भोसले यांचा पुतण्या या अपघातात गंभीर जखमी झाला होता. अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 9 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने बजावूनसुद्धा भरपाई न दिल्याबद्दल सांगलीतील न्यायालयाने कर्नाटक राज्यातील बस जप्त केली.
2015 मध्ये भानुदास बाबुराव भोसले किल्ला भाग मिरज येथून दुचाकीवरून मागे बसून चालले होते. त्यांचा पुतण्या दुचाकी चालवत होता. पुलावरून जात असताना कर्नाटक बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भानुदास भोसले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी भानुदास भोसले यांच्या पत्नी विजया भोसले यांनी सांगली येथील न्यायालयामध्ये ॲड. आर. एम. भाले यांच्यामार्फत नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. यावर सुनावणी होऊन भरपाईपोटी 8 लाख 33 हजार 563 रुपये कर्नाटक एसटी महामंडळाने विजया भोसले यांना देण्याचे आदेश 2016 मध्ये दिले होते.
गेल्या सहा वर्षात या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे भोसले यांनी पुन्हा न्यायालयात दाद मागितली. तेव्हा आदेशानंतरही भरपाईची रक्कम न दिल्याने अपघातातील बस किंवा कर्नाटक एसटी महामंडळाच्या मालकीची कोणतीही बस जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच बसच्या चाव्या भोसले यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.