मुंबई : रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर, भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवण्याची परवानगी नसले. जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईतील ७२ टक्के मशिदींनी पहाटेचा भोंगा बंद केला आहे. भोंग्याचा वापर न करताच पहाटेची अजान केली जात असल्याचे पोलिसांनी गोपनीयरीत्या घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील सर्व धर्मांचे धर्मगुरू, मौलाना यांची बैठक पोलिसांनी घेतली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कोणती कारवाई केली जाते, याची माहिती पोलिसांनी सर्वांसमोर ठेवली.
राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधील लाऊडस्पीकर लावण्यास बंद घालण्यात आली आहे. तशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. इतकंच नाही तर सायलेन्स झोनमधील धार्मिक स्थळांना तर पूर्णपणे लाऊडस्पीकर बंदी घालण्यात आली आहे. परवानगी न घेता अनधिकृतपणे लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे.
Loudspeaker banned from 10pm to 6am
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
येत्या 3 मे रोजी मनसेकडून राज्यभर महाआरती आणि हनुमान चालिसा करण्यात येणार आहे. 3 मे रोजी ईद असली तरी त्याच दिवशी अक्षय तृत्तीयाही आहे. त्यामुळे त्या दिवशी राज्यात महाआरती आणि हनुमान चालिसाचं आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे डेसिबल मोजण्याचे आदेश दिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीमकडून भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी त्यांनी डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात आलं. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सय्यद पिंप्री गावात मशिदीत नमाज सुरु झाल्यानंतर भोंग्याचं डेसिबलही मोजण्यात आलं.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केले होते. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत, ‘महाराष्ट्र काही दिवसांत धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरला परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची शक्यता आहे’, असं म्हटलं. ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळांनी यासंदर्भात चिंता व्यक्त करत अनेक मार्गदर्शक तत्वे याआधीच जाहीर केली होती. मात्र आता पुन्हा लाऊडस्पीकरचा मुद्दा राज ठाकरेंनी उचलून धरला आहे. त्यामुळं भारतात लाऊडस्पीकरचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/524744419203292/