Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी सोलापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पैसे घेतल्याची कबुली

Surajya Digital by Surajya Digital
April 20, 2022
in Hot News, महाराष्ट्र, सोलापूर
0
चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी सोलापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल
0
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पैसे घेतल्याची कबुली

सोलापूर / मुंबई : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरुन मराठा जाती विरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकविणे तसेच चिथावणीखोर वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण केल्या प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी फिर्याद दिली आहे. यावरून फौजदार चावडी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान , सदावर्तेना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते यांच्या अडचणी वाढतच आहेत. त्यातच आता मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं सदावतेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सदावतेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली. जवळपास 48 हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

 

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी २७ जून २०१९ रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या निकालाविरुध्द नापसंती दर्शवली होती. त्यांच्या निर्णयावर शंका घेऊन निकाल देणारे न्या. रणजित मोरे हे मराठा जातीचे आहेत, असे म्हणून त्यांची जात काढून, मराठे हे शुद्र आहेत, अशी भाषा वापरली होती. न्या. रणजित मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ऐकून त्यांच्या दबावाखाली मराठा समाजाच्या बाजूने सेटींग-बेटींग करुन निकाल दिला आहे, असाही आरोप सदावर्ते यांनी केला होता.

 

https://fb.watch/cvE6CGEkXG/

 

जाणीवपूर्वक न्यायाधीशांविषयी जातीय व्देषातून अवमानकारक भाषा वापरुन न्यायमूर्तींची बदनामी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाचे न्यायनिर्णयावर संशय घेऊन ओबीसी जाती, खुल्या प्रवर्गातील ब्राम्हण, वैश्य, आर्य या जातीमध्ये तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ए. बी. व्ही. पी. संघटना यांच्यात व मराठा समाजामध्ये जातीय व्देष निर्माण होऊन तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते.

सार्वजनिक शांतता भंग होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य करुन मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केला. या प्रकरणी सदावर्ते यांच्याविरुध्द योगेश पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Case filed against Sadavarte in Solapur for provocative statement

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सदावर्तेना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते यांच्या अडचणी वाढतच आहेत. त्यातच आता मुंबईच्या गिरगाव न्यायालयानं सदावतेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सदावतेंनी स्वतः कोर्टात बाजू मांडली. जवळपास 48 हजार एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

गिरगाव कोर्टाने  गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतले होते आणि त्या पैशातून मालमत्ता, गाडी खरेदी केली.

याप्रकरणाच्या तपासाकरता पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. कोर्टात युक्तीवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी म्हटलं, सदावर्ते यांच्या घराच्या झडतीत महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. कागदपत्रे, रजिस्टर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावेळी विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी हर्षद मेहता प्रकरणाचा निकाल सदावर्ते प्रकरणात रिफरन्स म्हणून वाचून दाखवला.

गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: युक्तीवाद करत आपली बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजूने आज कोर्टात कुणीच वकील आलं नसल्याने त्यांनीच आपली बाजू मांडली. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, पोलीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायेत की हा एक मोठा स्कॅम आहे. मी 300 ते 500 रुपये घेतले पण ते फक्त कोर्ट कामकाजाकरता घेतल्याचे म्हटले.

एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो हे सांगावे असाही सवाल सदावर्तेंनी उपस्थित केला. कागदपत्र जप्त केले ते वकालत नामा आहेत. माझ्या प्रकरणात हर्षद मेहता प्रकरणाचा दाखला दिला गेला दुःखद आहे. माझे सासू सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. गाडी घेतली त्याची नोंद आरटीओमध्ये आहे. गाडी घेण्याकरता पैसे दिले ते ॲानलाईन दिल्याचे पुरावे आहेत. गाडी जुनी आहे, 2014 ची जुनी गाडी मी खरेदी केल्याचे सांगितले.

 

Tags: #Case #filed #Sadavarte #Solapur #provocative #statement#चिथावणीखोर #वक्तव्याप्रकरणी #सोलापूर #सदावर्ते #गुन्हा #दाखल
Previous Post

बाजारातून 2 हजार रुपयांच्या नोटा अचानकपणे गायब; अनेकांची वाढली डोकेदुखी

Next Post

रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकरला बंदी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकरला बंदी

रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकरला बंदी

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697