सोलापूर : चलन हे माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. देवाण घेवाण, खरेदी-विक्रीसाठी चलनाचा (पैसे) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र सध्या मोठी आर्थिक उलाढाल करताना उद्योजक, व्यावसायिकांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. बाजारातून २ हजार रुपयांच्या नोटा अचानकपणे गायब झाल्या असून व्यवहार करताना मर्यादा येत आहेत.
भारतातील काही धनिकांकडे काळा पैसा असल्याची चर्चा चांगलीच रंगली तसेच राजकारण्यांचे परदेशातील बँकेत खाती असून त्यात हजारो कोटी रुपयांच्या रकमा ठेवल्या आहेत. तसेच घरात ही घबाड असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषणेनंतर १०० रुपयांच्या नोटा मिळवण्यासाठी बँका आणि एटीएम बाहेर सर्वसामान्य नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
बऱ्याच उद्योजक, व्यावसायिकांचे या कालावधीत दैनंदिन व्यवहार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नोटबंदीच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदी यांनी व्यवस्थेतील भ्रष्टाचार काळा पैसा, दहशतवाद्यांना मिळणारी रसद अशी कारणे दिली होती. सुरुवातीला लोकांनी त्रास सहन करुनही त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले होते.
Rs 2,000 notes suddenly disappear from the market; Increased headaches for many
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर करताना कुठलाही कायदा बनवला नाही. यापूर्वी १६ जानेवारी १९७८ रोजी संसदेत कायदा करून नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान होते. त्यावेळी सुब्दा जनहितासाठी हा निर्णय घेत असल्याचे सरकारने म्हटले होते.
□ अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीत
नोटबंदी केल्यानंतर मोदी यांनी ५०० आणि २००० हजारांच्या नोटा काढल्या. मात्र आजा पाच वर्षांनंतर बाजारात सरास ५०० रुपयांच्याच नोटा दिसत आहेत. सर्वसामन्यांना तर २००० हजारांची नोट दिसेनाशी झाली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे? केंद्र सरकारने घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयाचा उद्देश साध्य झाला का? काळा होत होती. पैसा बाहेर आला का? भ्रष्टाचार कमी झाला का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच लघुग्योजकांची ‘व्यवहार’ करताना डोकेदुखी वाढली आहे.
□ गौडबंगाल काय ?
महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये नोटबंदीची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. केंद्र सरकार नेमके काय करते? निर्णय कोणासाठी घेतले जातात? जुन्या नोटांचे केले काय ? नवीन ‘त्या’ दोन हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या का?, अशी चर्चा होऊ लागली आहे. जवळपास २ हजार रुपयांची नोट बाजारातून गायब झाल्याने गौडबंगाल काय? असे तर्कविर्तक लावले जात आहेत.