नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मास्क सक्तीसारखे निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. याआधी उत्तर प्रदेश आणि हरयाणातील काही जिल्ह्यात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
कोरोनाच्या सुरुवातीपासून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांनी धडकी भरविली होती. देशातील बहुतांश रुग्ण या तीन राज्यांतून मिळत होते. यात दिल्लीचा देखील मोठा वाटा होता. आता पुन्हा दिल्लीसह पाच राज्यांत कोरोना वाढू लागला असून केंद्र सरकारकडून या राज्यांना कोरोनाच्या पंचसुत्रीचे पालन करण्यासाठी पत्र आले आहे.
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 150 नवीन रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11 हजार 365 आहे. अशात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम सरकारांना पत्र लिहिले आहे. यामध्ये आरोग्य सचिवांनी राज्यांना सतर्कता वाढवण्यास आणि संसर्गाचे प्रमाण वाढण्याच्या कारणांचा गांभीर्याने तपास करण्यास सांगितले आहे.
आरोग्य सचिवांनी सांगितले की, या राज्यांमध्ये दररोज सकारात्मकतेचे प्रमाण वाढत आहे, म्हणजेच दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पाहता, राज्य सरकारांनी परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास कोविड-19 बाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.
Restrictions? Centre’s letter to 5 states including Maharashtra, possibility of masking
#COVID19 | Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Haryana, Uttar Pradesh, Delhi, Maharashtra, and Mizoram on the increasing positivity rate and cases pic.twitter.com/vHqZUCObi4
— ANI (@ANI) April 19, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट..
देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असताना दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, केरळ आणि मिझोराममध्ये गेल्या सात दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि मिझोरामला अलर्ट पाठवला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत केरळमध्ये 353, महाराष्ट्रात 113, हरियाणामध्ये 336 आणि मिझोराममध्ये 123 रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊले उचलावीत, असे म्हटले आहे. यासाठी टेस्ट – ट्रॅक – ट्रीट- व्हॅक्सिनेशन आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यास सांगितले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यावर जोर देण्यात आला आहे. कोणत्याही स्तरावर काळजी घेण्यात चूक झाली तर आजवर कोरोनावर मिळविलेले नियंत्रण कमी होईल.
कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या धोक्यादरम्यान, सरकारने जाहीर केले आहे की 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना 10 एप्रिलपासून कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. आरोग्य मंत्रालयाने याला प्रिकॉशन डोस असे नाव दिले आहे. हे आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना विनामूल्य दिले जाईल, तर उर्वरित प्रौढांना पैसे द्यावे लागतील. हा डोस खासगी लसीकरण केंद्रांवर दिला जाईल.
दिल्ली आणि आजूबाजूच्या सीमावर्ती भागातील नोएडा एनसीआर, चंदीगड आदी भागात कोरोनाने भिती निर्माण झाली आहेत. रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत नसले तरी पॉझिटिव्हीटी रेट ८ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.