● वर्षातच कोरोनाने मुलगा हिरावला
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी – बीबीदारफळ रोडवर ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात उत्तर सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख शहाजी भोसले (वय ५८) हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कोंडी गावावर शोककळा पसरली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणात त्यांचा एकुलता एक मुलगा शिवाजी भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आघातामुळे गेल्या वर्षभरापासून भोसले खचले होते. एका वर्षाच्या कालावधीत पिता-पुत्रांच्या मृत्यूमुळे शोक व्यक्त केला जात आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे कोंडी गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री कोंडी-बीबीदारफळ रस्त्यावरून भोसले हे जात होते. रात्रीच्या वेळी त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांच्यावर सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे ते बेशुद्ध अवस्थेत होते. दोन दिवसांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही भोसले याचा मृत्यू झाला. भोसले यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, तीन लहान भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे.
मृत शहाजी भोसले शिवसेनेचे उत्तर तालुकाप्रमुख व कोंडी गावचे माजी सरपंच होते. २०१४ साली तत्कालीन सरपंच शंकर पाटील यांच्या अकाली निधनानंतर, कोंडी गावच्या सरपंचपदी शहाजी भोसले यांची वर्णी लागली होती. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
Shiv Sena’s North Solapur taluka chief Shahaji Bhosale killed in an accident
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या 26 जण अपघातात जखमी
सोलापूर : कर्नाटकातील शिरनाळ येथे जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेले कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील २६ जण पिकअप उलटून झालेल्या अपघातात जखमी झाले. माजी जि. प. सदस्य आप्पाराव कोरे, भाजपचे हणमंत कुलकर्णी, सुधाकर कोरे यांनी तत्परता दाखवल्याने जखमींना लवकर उपचार मिळण्यास मदत झाली.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कारकलचे नातेवाईक पिकअपमधून अंत्यविधीसाठी निघाले. वाहन माळकवठेच्या पुढे वळणावर आले असता पलटी झाले. अपघाताची माहिती कळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन थेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
जखमींची नावे अशी, सुरेश बिराजदार, लक्ष्मण मरगूर, लक्ष्मण बिराजदार, महादेव बिराजदार, छायाबाई बिराजदार, संजय बिराजदार, मल्लप्पा बिराजदार, गुरप्पा इंडी, आंदव्वाबाई काळे, काशीनाथ बिराजदार, शांतप्पा बिराजदार, शारदाबाई बिराजदार, संगप्पा उंबरजे, काशीनाथ गुरप्पा बिराजदार, महानंदा बिराजदार, सिध्दगोंडा, शंकरप्पा, पालाक्षी, अशोक, अनिता, सुरेखा, धोंडप्पा बिराजदार, महादेवी गाढवे, मल्लिकार्जुन भोगडे, जयश्री राजमाने, विजयालक्ष्मी उंबरजे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/524819522529115/