नवी दिल्ली : आसाम पोलिसांनी बुधवारी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना पालपूर सर्किट हाऊस येथून अटक केली आहे. गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी ही माहिती दिली आहे. आसाम पोलिस अहमदाबाद विमानतळावरून सकाळी चार वाजता जिग्नेश मेवाणी यांना घेऊन गेले, अशी माहिती देण्यात आली आहे. तर आसाममध्ये जिग्नेश यांच्याविरोधात केस दाखल असल्याचे समोर आले आहे.
गुजरातमधील वडगाममधून मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आसाममध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आसाम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज त्यांना गुवाहाटीमध्ये नेण्यात येण्याची शक्यता आहे. मेवाणी यांच्या टीमशी संबंधित एका कार्यकर्त्याने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आमच्याशी शेअर केलेली नाही. त्याच्यावर आसाममध्ये काही गुन्हे दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे, असे त्याने म्हटले आहे.
Congress MLA Jignesh Mewani arrested
https://www.facebook.com/109399567404448/posts/525246345819766/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांना पालनपुर सर्किट हाऊसमधून बुधवारी रात्री अटक केली. अटक केली तेव्हा त्यांना एफआयआरची प्रत पोलिसांनी दाखवली नसल्याचे जिग्नेश मेवाणी यांच्या टीममधील एकाने सांगितले. मात्र, दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. मेवाणी यांना रात्रीच अहमदाबाद येथे नेण्यात आले होते. मेवाणी यांना आज, गुरुवारी गुवाहाटी नेण्यात येणार आहे.
मेवाणी यांना अटक केल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्ते, मेवाणी समर्थकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यासह अनेक आमदार अहमदाबाद विमानतळावर पोहचले. त्यांनीदेखील जिग्नेश मेवाणींच्या समर्थनात आणि आसाम पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. जगदीश ठाकोर यांनी सांगितले की, जिग्नेश यांच्याविरोधात आरएसएसविरोधात ट्वीट केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका आमदाराला धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा तक्रारींना जिग्नेश मेवाणी अथवा काँग्रेसदेखील घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.
जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, एका ट्वीटमुळे अटक करण्यात आली. पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून मी घाबरणार नाही. मी माझी लढाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/525244719153262/