मुंबई : एका महिलेविरोधात मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी महिलेविरोधात तक्रार दिली आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान फोनवरून 5 कोटींची मागणी केली आणि पैसे न दिल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करणार, अशी धमकी महिलेने आपल्याला दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पैशाची मागणी करून धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी दिली होती. त्यानंतर मुंबईच्या गुन्हे शाखेने तिला आज अटक केली आहे.
याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी त्यांनी तक्रारीत रेणु शर्मा यांनी दिलेल्या धमकीचा मेसेज सांगितला होता. पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?”,असा मॅसेज तिने मुंडेंना पाठविला होता अस धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.
Threat to file rape case against Munde, ransom complaint against woman
https://www.facebook.com/109399567404448/posts/525301159147618/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रेणू शर्मा या महिलेनं मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती. त्यानंतर काही दिवसांतच तिनं सदर तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हॉट्सअॅप तसेच फोन करून पैशांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांत दिले असल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
रेणू शर्मा या मूळच्या मध्यप्रदेश येथील इंदौर मधील असून त्या करुणा शर्मा यांची बहीण आहेत. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी ( इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केली आहे. तसेच, ही महिला परिचयाचीच असून महिलेनं 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर रेणू शर्माला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं रेणू शर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.