सोलापूर : पंढरपुरातील सुस्ते येथे राहणा-या युवकाने मानसिक तणावाखाली जाऊन अकलूजमध्ये जावून आत्महत्या केलीय. या घटनेमुळे सुस्ते गावात हळहळ व्यक्त होत आहे.
ओंकार नारायण सालविठ्ठल (वय २७, रा. सुस्ते, पंढरपूर) असे त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. उद्योगधंदासाठी पैसे उपलब्ध नसल्याने व कामात सतत अपयश येत असल्याने एका तरुणाने आयुष्याला कंटाळून १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घर सोडला. त्यानंतर मम्मी आज तुझ्या हातचा शेवटचा चहा पिऊन आलोय, असे म्हणत आईला फोन केला. त्यानंतर ४.१३ वाजता आत्महत्या करित असून माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी व व्हिडिओ ५.४५ वाजता बहीण गौरी भोसले व सोमनाथ सालविठ्ठल यांच्या मोबाईलवर पाठवून जगाचा निरोप घेतला.
मानसिक तणावाखाली जाऊन गावापासून म्हणजेच वेळापूर या गावी जाऊन आपल्या आई-वडिलांना व्हिडिओ कालच्या माध्यमातून बोलून सदर आपले लोकेशन आई वडिलांना पाठवून दिल्यानंतर स्वतः विष प्राशन करून आपले जीवन संपवले, तर आई वडील त्या लोकेशनचा मार्ग काढत ठिकाणी त्या पोहोचल्यानंतर मुलगा निपचित पडल्याचे पाहिले. अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Pandharpur youth commits suicide by going to Akluj
https://www.facebook.com/109399567404448/posts/525301159147618/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ओंकार सालविठ्ठल याचे शिक्षण एमबीएपर्यंत पूर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. घरची परिस्थिती हलाखीची, वडील विठ्ठल साखर कारखान्यात नोकरी करत आहेत. घरच्या परिस्थितीचे भान ठेवून ओंकार नोकरीसाठी प्रयत्न करत होता. नोकरी भेटत नव्हती, नोकरीवर न अवलंबता त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करायचा निश्चय केला होता.
वडिलांची पावणेसहा एकर जमीन आहे. जमिनीवर बँकेचे कर्ज असल्यामुळे दुसरे कर्ज मिळत नव्हते. यामुळे आईवडिलांच्या जीवावर किती दिवस बसून खायचं, ही गोष्ट ओंकारला खटकत होती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. त्याला अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र १९ एप्रिल रोजी ओंकारचे निधन झाल्याची माहिती वडील नारायण सालविठ्ठल यांनी दिली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
या मुलाच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क म्हणजेच नोकरी न लागल्यानेही विष प्राशन केल्याचेही बोलले जात आहे. याचा प्राथमिक तपास अकलूज पोलिस स्टेशनचे रमेश सुरवसे पाटील हे करीत आहेत तसेच पुढील तपास वेळापूर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.