मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर आज हल्ला करण्यात आला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केला, गाडीवर दगडफेक केली, यात गाडीची काच फुटली आणि यामुळे सोमय्यांना दुखापत झाली, थोडे रक्त निघाले, असा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोमय्यांनीच शिवसैनिकांवर गाडी घातली, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. खार पोलिस ठाण्यात राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी सोमय्या आले होते. त्यावेळी ही घटना घडली.
या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत. त्यांना दुखापत झाली आहे. तसेच या दगडफेकीत गाडीचं नुकसान झालं आहे. स्वत सोमय्या यांनी याबाबत ट्विट केलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरने आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे.
या हल्ल्यामध्ये शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगड, चप्पल आणि बाटल्या फेकल्याचं समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली. या राणा दाम्प्त्याला भेटायला सोमय्या गेले होते. तिथून परतताना त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हा हल्ला केला. या दरम्यान हा शिवसैनिकांनी हल्ला केला.
या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीच्या दरवाज्याची काच फुटली आहे. त्याचवेळेस सोमय्या जखमी झाले. त्यांच्या हनुवटीतून रक्त आलं. आता या सर्व हल्ल्याविरोधात किरीट सोमय्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे वृत्त आहे.
Attack on Kirit Somaiya’s car
https://www.facebook.com/109399567404448/posts/526954108982323/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
नवनीत राणा आणि रवि राणा यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी तिथे असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या आणि दगड त्यांच्या गाडीच्या दिशेनं फेकून मारले.
किरीट सोमय्या म्हणाले की, “पोलिसांच्या उपस्थितीत मला मारहाण केली. पोलिसांच्या उपस्थितीत गुंड पोलीस स्टेशनच्या आवारात शिरतात. शिवसैनिकांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत नाही, तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून हलणार नाही.”
हल्ला झाला त्यावेळी किरीट सोमय्या गाडीच्या मधल्या सीटवर बसलेले होते. दगडामुळे गाडीच्या खिडकीची काच फुटली. तसेच किरीट सोमय्या यांनाही दुखापत झाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या गाडीतून तसेच पुढे निघून गेले. रात्री दहा वाजता खार पोलीस ठाण्याच्या बाहेर ही घटना घडली.
शुक्रवारी रात्रीच भाजपचे मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. मातोश्रीबाहेरून जात असताना कलानगर जंक्शन येथे मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप कंबोज यांच्याकडून करण्यात आला. तर कंबोज मातोश्रीची रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. मात्र, सलग दोन रात्रीत मुंबईत भाजपच्या दोन नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पोलीस स्टेशनच्या आवारात हा हल्ला झाला असून राज्याची अवस्था ही पश्चिम बंगालपेक्षा वाईट झाली आहे. पोलिसांनी राणांवर गुन्हा दाखल केला पण शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला नाही. राज्य शासन पोलिसांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे. याचं उत्तर आता भाजप त्याच प्रकारे देईल, असे म्हणाले.