मुंबई : राणा दाम्पत्याला झालेल्या अटकेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले: आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला: साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक,’ असे ट्विट फडणवीस यांनी केले आहेत.
राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे.
कालपासून मातोश्रीच्या शिवसैनिकांनी घेरावबंदी करत राणा दाम्पंत्यांनी येथे येऊन दाखवावे असे म्हटले होते. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था टिकावी म्हणून मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यादरम्यानच काल मोहित कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. दरम्यान, आज नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना भादंवि कलम 153 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
त्यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी ट्विटरवरू ट्विट करताना, ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत, असे म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला करताना, ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला त्याविरोधात साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा करण्यात आली याची साधी दखल सुद्धा घेण्यात आलेली नाही. तर हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर त्यांना थेट अटक करण्यात येते. या महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत, असे म्हटले आहे.
Incidents in Maharashtra distressing; BJP aggressive on action against Rana couple
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्या आहेत.
➡️ भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही
➡️ मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही
➡️ महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही
➡️ हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 23, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आपल्या एका दुसऱ्या ट्विटमध्ये इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार. एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारे काही पाहते आहे ! असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी, निव्वळ लज्जास्पद असल्याचे म्हटले असून लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपल्याचे लिहले आहे. तर लोकशाहीचे गार्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान याच्या आधी फडणवीस यांनी, मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
यावर आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच, असेही त्यांनी म्हटले होते. तर मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणा दांपत्याच्या अटकेवर प्रतिक्रीया देतांना महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती पुर्ण बिघडली असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर टीका केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राणा दांपत्याच्या अटकेवर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, राणा दांपत्याला अटक केल्याबद्दल राज्यातील रावणराज्याचा निषेध…तसेच घोटाळेबाज उध्दव ठाकरे सरकारचे दहन होण्याच्या शक्यतेमुळे घाबरले आहे. त्यामुळे रात्री वा मी खार पोलिस स्टेशनला भेट देण्यासाठी जाणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/526704062340661/