अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे पंचक्रोशीतील गावांना आज शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसाने या भागातील केळी, कलिंगड, टरबूज, पपई, फुले ,फळे यासह वेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अगोदरच मेटाकुटीला आलेला बळीराजा व अवकाळी पावसाच्या अवकळा यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
आज शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे फळबागांचा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बोरगाव दे ,घोळसगाव, बादोले ,पालापूर, शिरवळ या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणात प्रचंड उकाडा व वातावरणात तफावत जाणवत होते. अशातच विजेच्या लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सुरुवातीला प्रचंढ वादळी वारे सुटले होते. त्यामुळे चिंच, आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडले.
Akkalkot: Delayed by hailstorm, hailstorm in Borgaon; Damage to watermelon, watermelon, mango
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सगळीकडे धुळीचे लोट व प्रचंड वाऱ्यामुळे अनेकांचे पत्रे उडाले. यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडले. आंब्याची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे. तापमानाचा पारा ४२ – ४३ वर गेला होता. त्यातच शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठा वाढण्याची चिन्हे आहेत.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणादरम्यान दुपारी 5 वाजताच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव आणि जिल्ह्यातील इतर गावांत ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील उन्हाचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. उन्हाळी पिकाचे नुकसान होणार आहे. सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथीचे रोग डोके वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/526642735680127/
□ पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचे
गेल्या २४ तासांमध्ये राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वारा आणि गडगडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. आता असंच वातावरण पुढचे दोन दिवसही पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
पुढचे दोन दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांनी आज विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली होती.