सोलापूर : सोलापूर ॲम्युचर खो – खो असोसिएशनच्या वतीने व न्यू सोलापूर क्लबच्या सहकार्याने राज्य खो खो पंच परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेस जिल्ह्यातील ३० परीक्षार्थी बसले.
ही परीक्षा जुनी मील कंपौंडमधील संभाजीराव शिंदे प्रशालेत पार पडली. या परीक्षेसाठी मुंबईचे निलेश परब हे परीक्षक होते. संभाजीराव शिंदे प्रशालेचे मुख्याध्यापक नागेश्वर काटकर यांनी परीक्षक परब यांचे स्वागत केले. यावेळी असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, रवींद्र नाशिककर, विजय तडसरे, न्यू सोलापूर क्लबचे अध्यक्ष मनोज संगावार आदी उपस्थित होते. गोकुळ कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश भोसले यांनी आभार मानले.
तत्पूर्वी या परीक्षेचे उद्बोधन वर्ग जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेत झाले. या वर्गास शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, श्रीरंग बनसोडे, गुलाम मुजावर यांनी मार्गदर्शन केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527325728945161/
□ सोलापूर जिल्हा खो-खो पंच परीक्षेत सचिनकुमार गाडेकर प्रथम
》 वाडीकुरोलीचे पाटील व वेळापुरचे बनकर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय
सोलापूर : जिल्हा खो-खो पंच परीक्षेत येथील सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक सचिनकुमार शिवलिंग गाडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. वाडीकुरोलीचे संतोष विलास पाटील व वेळापुरचे अजित गोरख बनकर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले.
सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनच्या वतीने व न्यू सोलापूर क्लबच्या सहकार्याने ही परीक्षा जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेत पार पडली.
Solapur: Attendance of 30 candidates from the district in the State Kho Kho Punch examination
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
परीक्षेचा निकाल असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केला. उत्तीर्ण परीक्षार्थी रविवारी (दि.२४) सकाळी ९ ते १२ या वेळात जुनी मील कंपौंडमधील संभाजीराव शिंदे प्रशालेत होणाऱ्या राज्य खो खो पंच परीक्षेसाठी पात्र ठरले. त्यांचे असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी अभिनंदन केले.
या पंच परीक्षेचे आणि यापूर्वी २९ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या पंच परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जुळे सोलापूर येथील वसुंधरा कला महाविद्यालयात होईल.
अन्य गुणानुक्रमे उत्तीर्ण परीक्षार्थी याप्रमाणे : समाधान सुरेश काळे (वाडीकुरोली), वैभव दयानंद बनसोडे, धनंजय शरद विभुते, प्रमोद विठ्ठलराव माने देशमुख (सर्व वेळापूर) यशोदीप माणिक आठवले, प्रशांत राजाराम वर्धमाने, रवी धनसिंग मैनावाले, समर्थ सिद्धेश्वर वाघमारे, सिद्धाराम सिदमला बिराजदार, कलप्पा शिवाजी चव्हाण, विराज रवींद्र जाधव (सर्व सोलापूर), प्रशांत चंद्रकांत सावंत (फलटण), नितीन संभाजी कोकरे, सौरभ ओमनाथ चव्हाण, राकेश दशरथ राठोड (सर्व सोलापूर), सागर कुंडलिक एकतपुरे (वेळापूर) अजर मुजीब मुल्ला, उमेश उद्धव सावंत, विकास नामदेव राठोड, अक्षय शिवाजी इंगळे, अक्षय सुरेश गवळी (सर्व सोलापूर) हरिदास चांगदेव शिंदे (खंडोबाचीवाडी).
https://www.facebook.com/109399567404448/posts/527316042279463/