पुणे : भारताचे माजी प्रशासकीय अधिकारी माधव गोडबोले यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. माधव गोडबोले यांनी 1959 साली भारतीय प्रशासन सेवेत पदार्पण केलं. मार्च 1993 मध्ये भारत सरकारचे ते केंद्रीय गृहसचिव होते. या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. केंद्र सरकारच्या सेवेत ते एका दशकाहून अधिक काळ कार्यरत होते. माधव गोडबोलेंनी इंग्रजी आणि मराठी पुस्तकं लिहिली आहेत.
खंबीर प्रशासकीय अधिकारी आणि लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने प्रशासनावर हातखंडा असणारा, संवेदनशील अधिकारी, परखड भाष्य करणारा लेखक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय गृहसचिव म्हणून माधव गोडबोले यांनी काम केले आहे. त्यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. डॉ. माधव गोडबोले हे निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. केली. 1959 साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. मार्च 1993 मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव आणि नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं होते.
या आधी ते महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनात मुख्य वित्तसचिव पदावर जबाबदारी सांभाळली. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले. माधव गोडबोले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी सुजाता, मुलगा राहुल, मुलगी मीरा आहेत.
Former Administrative Officer of India Madhav Godbole dies
https://www.facebook.com/109399567404448/posts/527729515571449/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
डॉ. माधव गोडबोले यांनी प्रशासनासह साहित्यसंपदेतही आपला ठसा उमटवला. माधव गोडबोले यांनी जवळपास 22 पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाला आहे. An unfinished innings हे आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘अपुरा डाव’ या नावाने प्रकाशित झाले आहे. तर, भारताच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition – An Inquest या पुस्तकाचीही चर्चा झाली. माधव गोडबोले यांच्या मराठीतील पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
माधव गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्.डी. या पदव्या मिळवली. डॉ. माधव गोडबोले यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्य आर्थिक सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्याशिवाय, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.
डॉ. माधव गोडबोले हे सन 1959 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. केंद्र सरकारचे गृहसचिव असताना 1993 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी प्रशासकीय धोरणांच्या अनुषंगानेही जबाबदारी पार पाडली. माधव गोडबोल यांनी निवृत्तीनंतर जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
भारतीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदी पाडण्याची घटना होत असताना ते केंद्रीय गृहसचिव होते. त्यांनी आणि त्यांच्या मंत्रालयाने दिलेल्या सूचनांकडे त्यावेळचे पंतप्रधान नरसिंहराव राव यांनी गांभीर्यपूर्वक पाहिलं नसल्याची चर्चा आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527799745564426/