कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची संकल्पसभा झाली. यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. ‘फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेताना आम्हाला अभिमान वाटतो. ज्यांना फुले- शाहू – आंबडेकरांचे नाव का घेता, असा प्रश्न पडतो, त्यांना महाराष्ट्र समजला नाही, एवढेच बोलू शकतो,’ असे पवार यांनी म्हटले.
शरद पवार म्हणाले की, “काहीनी संघटना काढली, त्या माध्यमातून माझ्यावर टीका केली. त्यांनी माझ्यावर टीका केली की तुम्ही शिवाजी महाराज यांचं नाव का घेत नाही. शिवाजी महाराजांचं नाव आपल्या अंत:करणात आहे. अनेक राजे होऊन गेले. पण 300- 400 वर्षानंतर केवळ शिवाजी महाराज यांचे नाव येतं. आंबेडकर यांच्याबाबत अनेकांना माहिती नाही की वीज आणि जलसंधारण खात्याचे मंत्री होते. अनेक महत्त्वाचे निर्णय त्यावेळी आंबेडकर यांनी घेतले होते. देश पुढे न्यायचा असा असेल तिथं वीज नेली पाहिजे त्यासाठी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन त्यांनी सुरू केलं होतं. देशाला नवीन दिशा देण्याचं काम आंबेडकर यांनी केलं होतं. ज्यांना फुले, आंबेडकर यांचं का नाव घेता असा प्रश्न पडतो त्यांना महाराष्ट्र समजला नाही.”
कोल्हापूरच्या संकल्प सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. सध्या देश एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असल्याने संकुचित विचारांना खड्यासारखे बाजूला सारा,’ असे पवार यांनी आवाहन केले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांची तोंडं बंद करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादीचे दोन मंत्री जेल मध्ये आहेत. सुरुवातीला अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये घोटाळा केला असा आरोप होता. त्यानंतर 50 कोटी आणि आता 1 कोटी रुपये घोटाळा केला असा आरोप आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे, 20 वर्षांपूर्वी त्यांनी एक जमीन घेतली. एवढ्या वर्षात दिसली नाही आता त्यांना अटक केली आहे.”
Sharad Pawar’s attack on Raj Thackeray; Criticism of Jayant Patil saying BJP’s 3 Bujgavani!
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं की निवडणुकीत हरलो तर हिमालयात जाईल. पण तुम्ही कोल्हापूरकर हुशार आहात तुम्ही त्यांचा बंदोबस्त केलात. ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी माझी काळजी वाढली. मग जयंत पाटलांना बोललो तर ते बोलले मी जातो त्यांच्याबरोबर. मी म्हटलं तुम्ही कशाला जाता तर ते बोलले, खरंच ते नेमके कुठे जातायत ते पाहतो.”
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. ‘भाजप हा विलक्षण पक्ष आहे तो थेट उभा राहत नाही तो बुजगावणे उभे करतो. एसटी संपातलं बुजगावणं, भोंगा प्रकरणातलं बुजगावणं आणि आता हनुमान चालिसा प्रकरणातलं बुजगावणं…. या बुजगावण्यांकडून लोकांची माथी भडकवायची, मूळ मुद्द्यांवरून, महागाईच्या मुद्द्यावरून लोकांना दुसऱ्या मुद्द्यांवर न्यायचे काम सुरू आहे’, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील पुढं म्हणाले, राष्ट्रवादीची सभाही कागलमध्येच झालीय. हा योगा योग आहे की, आपल्या सर्वांचं नशीब, हे माहीत नाही. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष राष्ट्रवादी होईल याच्यात आता माझ्या मनात कोणतीही शंका नाहीय. कारण, कागलच्या भूमीचा आशीर्वाद घेऊन आमच्या कार्याचा समारोप केलाय, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, केंद्रात भाजपची सत्ता आहे. मात्र, दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तुम्हाला दिल्ली सांभाळता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलीय. तपोवन मैदानातील सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/526704062340661/