नवी दिल्ली : “एमएफ हुसेन पेंटिंग विकत घेण्यासाठी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांच्याकडून बळजबरी करण्यात आली. त्या पेटींग विक्रीतून मिळालेली 2 कोटींची रक्कम सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरण्यात आली”, असा धक्कादायक खुलासा येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी केला आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात राणा कपूर म्हटले.
राणा कपूरला ८ मार्च २०२० रोजी ईडीने ३० तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. राणा कपूर यांनी येस बँकेच्या सीईओ पदाचा गैरवापर करून आपल्या मुलींच्या कंपन्यांना फायदा करून दिल्याचा आरोप ईडीने केला आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, येस बँकेने ३०,००० कोटी रुपयांची कर्जे दिली होती. त्यापैकी २०,००० कोटी एनपीए (नॉन परफॉर्मिंग ॲसेट) झाले. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राणा कपूर आणि त्यांचे कुटुंबिय, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक कपिल आणि धिरज वाधवान यांच्याविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी राणा कपूर यांनी ईडीला बोलताना हे विधान केले आहे.
येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) धक्कादायक खुलासे केले आहेत. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, राणा कपूरने दावा केला आहे की, काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांच्याकडून एमएफ हुसैन पेंटिंग्ज विकत घेण्यास भाग पाडले होते.
Priyanka Gandhi forced to buy a picture worth Rs 2 crore – Rana Kapoor
https://www.facebook.com/109399567404448/posts/527063202304747/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनीही चित्रकला प्रकरणात बोलून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. राणा कपूरच्या म्हणण्यानुसार, नाराज होऊन त्यांनी २ कोटींचा चेक दिला. हा धनादेश प्रियंका वाड्रा यांच्या घरी देण्यात आला आणि त्याबदल्यात पेंटिंग मिळाले. भेटवस्तूमध्ये सापडलेल्या वस्तू गांधी कुटुंब विकतात, असा आरोपही राणा कपूर यांनी केला आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये राणा कपूर यांनी सांगितले आहे की, काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा, जे त्यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते त्यांनी हे पेंटिंग दोन कोटी रुपयांना विकत घेण्यासाठी अनेक फोन केले होते.
राणा कपूर यांनी हे पेंटिंग विकत घेतल्यास त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्याची शक्यता असल्याचेही मुरली देवरा यांनी सांगितले. या विक्रीतून मिळालेली रक्कम काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारासाठी वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राणा कपूरचा हवाला देत आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘मुरली देवरा यांनी प्रियंका वाड्राकडून पेंटिंग्ज खरेदी करण्यासाठी मला अनेक मोबाइल नंबरवरून अनेक कॉल आणि मेसेजही केले होते. खरं तर, मी या करारासाठी उत्सुक नव्हतो आणि काँग्रेस नेत्याच्या कॉल आणि मेसेजकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. शेवटी मला हा करार माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध करावा लागला, कारण मला मुरली देवरा तसेच गांधी कुटुंबाशी कोणतेही वैर नको होते.