□ भोंग्याच्या वाद, बैठकीसाठी फडणवीस, राज ठाकरे गैरहजर
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘नवनीत राणांना जेलमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली. पिण्याचे पाणी दिले जात नाही, वॉशरूमला जाऊ दिले जात नाही. तसेच एक महिला हनुमान चालिसा म्हणते म्हणून 124-अ अंतर्गत तुरुंगात टाकलं जात असेल आणि दलित असल्याची जाणीव करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलेलं आहे, असंही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांवर सातत्यानं हल्ले सुरू आहेत. त्यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध कशाला? आम्ही कुठंही हनुमान चालीसा म्हणू शकतो असं म्हणत फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा म्हणून दाखवली. त्यानंतर पत्रकार परिषदेला उपस्थित भाजपा नेत्यांनी टाळ्या वाजवून फडणवीसांना प्रतिसाद दिला. हनुमान चालिसा पठणानं राजद्रोह होत असेल, तर आम्ही दररोज राजद्रोह करण्यास तयार आहे. सरकारनं केसेस दाखल करून घ्याव्यात, असं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं.
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला ३ मेपर्यंची मुदत दिली आहे. त्यामुळे वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित होते. त्याबद्दल फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. गेल्या ४-५ दिवसांत घडलेल्या घटना, भाजप नेत्यांवरील हल्ले पाहता सरकारनं संवादासाठी जागा ठेवली आहे, असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो नाही, असं फडणवीस म्हणाले. गृहमंत्र्यांनी महत्त्वाच्या विषयावर बैठक बोलावली. पण त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच उपस्थित नव्हते. मग ती बैठक केवळ टाईमपाससाठी होती का?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.
विरोधकांना जिवानिशी संपवायचं, हीच प्रवृत्ती असेल तर आम्ही संघर्ष करू. किरीट सोमय्यांना केंद्राची झेड दर्जाची सुरक्षा आहे. पण पोलिसांसमोर त्यांच्यावर हल्ला झाला. मोहित कंबोज यांचं मॉब लिन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला. एफआयआर नोंदवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पोलखोल सभा, रथांवर हल्ले झाले. मात्र कितीही हल्ले झाले तरीही आम्ही गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधातील आमची लढाई सुरूच राहील, असं म्हणत फडणवीसांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
Navneet Rana was treated badly in jail and made to be a Dalit
https://www.facebook.com/109399567404448/posts/527849882226079/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्रात भोंगा वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी आत्तापर्यंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री अस्लम शेख, अनिल परब, उदय सामंत यांच्यासह वारीस पठाण, रईस शेख पोहोचले आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील, राज ठाकरे हे गैरहजर होते.
नवनीत राणा यांना भायखळ्यातील कोठडीत ठेवण्यात आलं. शनिवार आणि रविवारची रात्र कोठडीत घालवलेल्या नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक देण्यात आली, असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला. आता या सगळ्याबाबत त्यांनी त्यांच्या वकिलांमार्फत लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार केली असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.
नवरात्रात रात्रभर भजन, गर्बा व्हायचा, गणपतीचे कार्यक्रम रात्रीही व्हायचे, ज्या दिवशी सरकारने सांगितलं. 10 नंतर माईक नाही, त्यानंतर आम्ही ते बंद केलं, 12 दिवस जी सूट मिळते, त्यातच आम्ही 12 वाजेपर्यंत ते वाजवतो, असं फडणवीस म्हणालेत.
जर सुप्रीम कोर्टाचे आदेश हिंदू समाज मान्य करत असेल, तर तो आदेश इतर समाजांनीही मान्य केलाच पाहिजे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचंही देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे समर्थन केलंय.
https://www.facebook.com/109399567404448/posts/527936252217442/
● देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले…
– भोंग्याबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर भाजपकडून बहिष्कार.
– सरकारकडून पोलिसांचा दुरूपयोग केला जातोय, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरून सगळं सुरू.
– सरकारला जशात तसं उत्तर देण्याची ताकद भाजपमध्ये आहे. या सरकारने महाराष्ट्राचं पुरोगामीत्व संपवलं.
– हनुमान चालिसा भारतात नाही म्हणणार तर काय पाकिस्तानात म्हणायची का? नवनीत राणांना वाईट प्रकारची वागणूक देण्यात आली.