चेन्नई : तामिळनाडूच्या पृथ्वीराज नावाच्या व्यक्तीने बॅटरी चार्जिंगच्या समस्येमुळे आपली ओला ई-बाईक जाळली आहे. पृथ्वीराजने पेट्रोल ओतून आपल्या बाईकला आग लावली. याचा व्हिडिओही त्याने ट्विट केला आहे. तसेच ओला इलेक्ट्रिक कस्टमर केअरला पाठवलेल्या मेलचे स्क्रीनशॉटही त्याने शेअर केले आहेत. बॅटरी अचानक उतरत असल्याने बाईक बंद पडत असल्याची तक्रार पृथ्वीराजने केली होती.
देशात सध्या इलेक्ट्रिक वेहिकलबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. असे असताना अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या आगीच्या घटनांमुळे ग्राहक आणि इलेक्ट्रिक स्कूटर बनवणार्या कंपन्या चिंतेत आहेत. परंतु इलेक्ट्रिक स्कूटर्संना आग का लागत आहेत याचे कारण एका इलेक्ट्रिक स्कूटर बनवणार्या कंपनीने दिले आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी एथर एनर्जीने या घटनांचे विश्लेषण केले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे प्रमुख कारण त्यातील बॅटरी आहे असे या कंपनीने म्हटले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ज्या बॅटरीज आहेत त्या थंड हवामान असलेल्या देशांसाठी बनवलेल्या आहेत. अनेक इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांनी त्यांच्या स्कूटरसाठी लागणार्या बॅटरीज या परदेशातून आयात केल्या आहेत. या बॅटरी भारतीय हवामानानुसार बनवल्या पाहिजेत असे मत कंपनीने व्यक्त केले आहे.
ओला, ओकिनावा आणि प्योर ईव्ही या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. तेव्हा केंद्र सरकारने याची दखल घेतली असून डीआरडीओकडे चौकशीचे आदेश दिले आहेत. पुण्यात ओला स्कूटरला लागलेली आग आणि ओकोनावा स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी डीआरडीओ करणार आहे.
Ola e-bike: Petrol ignited, on the other hand, the donkey was tied up and taken out
https://www.facebook.com/109399567404448/posts/529156992095368/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ गाढवाला ओलाची ई-स्कूटर बांधली, शहरात धिंड
बीड : बीड जिल्ह्यातील परळीत ओला इलेक्ट्रिक स्कूटरवर नाराज असलेले ग्राहक सचिन गित्ते यांनी ही स्कूटर एका गाढवाला बांधली. तसेच या कंपनीवर विश्वास ठेऊ नका, असे पोस्टर हाती घेऊन शहरभर धिंड काढली. या सचिन यांनी ओलाची स्कूटर विकत घेतल्यानंतर 6 दिवसांनी ती बंद पडली. तसेच आतापर्यंत ती ठिक करण्यात आली नाही, असे सचिन यांचे म्हणणे आहे. यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर बंद पडल्यावर ओला कंपनीने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने रागाच्या भरात मालकाने ही वरात काढली आहे. नवीन इलेक्ट्रिक बाईक बंद पड़ली यानंतर त्या व्यक्तीने ओला कंपनीकडे तक्रार केली असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर राग आल्याने त्या व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटर गाढवाला बांधली आणि नंतर ती गावरभर मिरवणूक काढली. त्याचा अनोखा निषेध केला.
त्याचा आता व्हीडिओ ही व्हायरल झाला आहे. बंद पण नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनहीकडून दुर्लक्ष होत असल्याने बाईक मकाने ही इलेक्ट्रिक बाईकवाचून शहरात फिरवून गावभर चर्चा झाली. ही घटना बीड जिल्ह्यातील आहे. बीड जिल्ह्यात एका व्यक्तीने ओला इलेक्ट्रिक स्कूटरला विरोध केला. सचिन गिते असं या व्यक्तीचे नाव आहे.
पण ही स्कूटर बंद पडल्याने सचिन यांना राग आला त्यांनी गाढवाच्या पाठीमागे स्कुटर बांधत निषेध व्यक्त केला. सचिन गिते यांनी ओला इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्यानंतर सहा दिवसांनंतर स्कुटर चालायला प्रॉब्लम येऊ लागला. मग त्यांनी ओला कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर ओला मेकॅनिकने त्याची स्कूटर तपासली. पण ते दुरुस्त करण्यासाठी कुणीही आलं नाही. सचिन गिते यांनी कस्टमर केअरला अनेक फोन केले. मात्र त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी ही अशी मिरवणूक काढली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/529154152095652/